इंटीरियरसाठी प्रसिद्ध आहेत देशातील 'ही' Offices; फोटो पाहून तुम्हीही म्हणाल भारी! By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 12:07 PM2019-07-10T12:07:42+5:302019-07-10T12:18:55+5:30Join usJoin usNext आजुबाजूच्या वातावरणाचा मनावर परिणाम होत असतो. त्यामुळे ऑफिसमध्ये काम करताना कर्मचाऱ्यांसाठी चांगले वातावरण गरजेचे असते. ऑफिसमधील इंटीरियरचा कामावर परिणाम होत असतो. देशातही इंटीरियरसाठी प्रसिद्ध अशी यूनिक ऑफिसेस आहेत. त्याबाबत जाणून घेऊया. गुगल, हैदराबाद गुगलच्या ऑफिसमध्ये कलरफुल इंटीरियर करण्यात आले आहे. काम करताना येणारा तणाव दूर करण्यासाठी कर्मचाऱ्यांसाठी क्रिकेट पिच, टेबल टेनिस, फुटबॉल, पूल, एक्स बॉक्स यासारखे अनेक खेळ आहेत. तसेच आठवड्यात एकदा योग आणि जुम्बा सेशन असतं. काम करतान कर्मचाऱ्यांना व्यायाम करता यावा यासाठी ट्रेड मिलसोबत लॅपटॉप जोडण्यात आले आहेत. मिंत्रा, बंगळुरू मिंत्राचं ऑफिस हे चार मजली असून प्रत्येक मजल्यावर फॅशनशी संबंधित गोष्टी आहेत. संपूर्ण ऑफिसचं इंटिरियर हे सिल्वर लूकचं आहे. तसेच ग्राऊंड फ्लोरवर रनिंग ट्रॅक आहे. "थिंक, क्रिएट, ड्रीम, डिजाईन" अशी या ऑफिसची थीम आहे. फ्रेश डेस्क, चेन्नई चेन्नईच्या फ्रेश डेस्कचं ऑफिस सुंदर आहे. येथील पिलर्स आणि भिंतींवर झाडं लावण्यात आली आहेत. कर्मचाऱ्यांसाठी टेबल टेनिस, मिनी गोल्फ आणि फुटबॉलसारखे खेळ देखील ऑफिसमध्ये आहेत. मायक्रोसॉफ्ट मायक्रोसॉफ्टच्या ऑफिसमध्ये हिरव्या आणि नारंगी रंगाचा वापर करण्यात आला आहे. तसेच अनेक ठिकाणी संस्कृत भाषेत श्लोक लिहिण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यासाठी कॅफे आणि फोन रूम तयार करण्यात आली आहे. लूक-अप ऑफिस, बंगळुरू बंगळुरूतील लूक-अप ऑफिसमध्ये एम्फीथिएटर तयार करण्यात आले आहे. तसच स्काइप कॉलसाठी लाल रंगाचे मोठे फोन बुथ तयार करण्यात आले आहेत. पुर्ण ऑफिसमध्ये हँगिंग लाईट्स आहेत. परिमल इंटरप्राइज, मुंबई मुंबईसारख्या शहरातील लोकांना गावासारखे फिलिंग देण्यासाठी हे ऑफिस गावाच्या थीमवर तयार करण्यात आले आहे. बायोफिलियाच्या सिद्धांतावर हे ऑफिस डिझाईन करण्यात आले आहे. शॉवर रूम आणि फ्री फूडसारख्या अेक सुविधा ग्राहकांना देण्यात आल्या आहेत. टॅग्स :गुगलभारतकर्मचारीgoogleIndiaEmployee