'असे' भन्नाट स्विमिंग पूल कधी पाहिलेत का? By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2018 10:59 PM 2018-05-04T22:59:55+5:30 2018-05-04T22:59:55+5:30
स्पेनच्या हॅसिएन्डा हॉटेलमध्ये स्विमिंग पूल सोबतच निसर्ग सौंदर्यदेखील अनुभवता येतं.
गगनचुंबी इमारतीवर स्विमिंग करण्याची इच्छा असलेल्यांना मरिना बे सँड रिसॉर्टमध्ये हा अविस्मरणीय अनुभव घेता येईल. सिंगापूरमध्ये हे रिसॉर्ट आहे.
बेल्जियममध्ये असलेल्या एका स्विमिंग पुलची खोली तब्बल 113 फूट इतकी आहे.
आफ्रिका म्हटलं की सगळ्यांना आफ्रिकन सफारी आठवते. मात्र हीच जंगल सफारी करताना तुम्हाला स्विमिंग पूलमध्ये डुंबण्याचा अनुभवदेखील घेता येतो.
समुद्राच्या अगदी शेजारी असलेल्या स्विमिंग पूलमध्ये पोहण्याची मजाच काही और. चिलीमध्ये समुद्राजवळ असणारा स्विमिंग पूल तब्बल 7.20 एकरवर पसरलाय.