याला म्हणतात पर्यावरण रक्षण! २५ कोटींचं घर संपूर्ण बदलंल फक्त झाडासाठी, पाहा या घराचे फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 03:55 PM 2021-11-12T15:55:42+5:30 2021-11-12T16:15:29+5:30
तुम्ही कोट्यवधींची इमारत बांधली असेल आणि त्यात एखाद्या गोष्टीचा अडथळा येत असेल, तर तुम्ही काय कराल? ती वस्तू सहज उखडून फेकून द्याल. मात्र मध्यप्रदेशातील महतो कुटुंबानं एका झाडासाठी त्यांच्या तब्बल 25 कोटींच्या इमातीचं स्वरुप बदललं. दहा वर्षांपूर्वी लावलेल्या या झाडाचा कुटुंबातील सगळ्यांनाच लळा लागला होता. त्यामुळे झाडाला धक्का लागणार नाही, अशा बेताने इमारतीचा प्लॅन बदलण्यात आला. कसा पाहा photos मध्यप्रेदशच्या छतरपूरमधील महतो कुटुंबानं एका झाडाला वाचवण्यासाठी आपल्या 25 कोटींच्या इमारतीत अनेक बदल केले.
दहा वर्षांपूर्वी त्यांनी हे झाड लावलं होतं. हे झाड म्हणजे आपल्याच कुुटुंबातील एक सदस्य असल्याचं ते मानत होते.
दहा वर्षांपूर्वी त्यांनी हे झाड लावलं होतं. हे झाड म्हणजे आपल्याच कुुटुंबातील एक सदस्य असल्याचं ते मानत होते.
महतो कुुटुंबीयांच्या या प्रयोगाची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
शहरातीत तिठ्यावर असणाऱ्या इमारतीच्या छतावर हे झाड उगवल्यासारखं दिसतं. त्यामुळे येणाजाणाऱ्यांना अश्चर्य वाटतं. इमारतीच्या छतावर एवढं मोठं झाड कसं उगवलं, असा प्रश्न लोकांना पडतो.
प्रशांत महतो यांनी दिलेल्या माहितीनुसार झाडाचं मूळ हे जमिनीतच आहे. त्याचं खोड दोन मजले उंच आहे. तर त्याची पानं तिसऱ्या मजल्याच्या गच्चीवरूून दिसतात.
त्यामुळे लोकांना हे झाड गच्चीवर उगवलं आहे, असं वाटतं. मात्र प्रत्यक्षात वस्तुस्थित वेगळीच आहे.
मालती महतो या दहा वर्षांपूर्वी हे रोप घेऊन आल्या होत्या. त्यावेळी फारसा विचार न करता घराच्या मध्यभागी ते लावण्यात आलं होतं.
मात्र त्यानंतर इमारत पाडून पुन्हा बांधण्याचा निर्णय झाला. मात्र तरीही झाडाला धक्का लागू न देण्याचा निर्णय कुटुंबानं घेतला.
अगोदर घर छोटं होतं. मात्र त्यानंतर ते डेव्हलप करून दोन शोरुमही तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी हे झाड तोडण्याचा सल्ला अनेकांनी दिला होता. मात्र हे झाड न तोडता इमारत बांधायचा निर्णय कुटुंबानं घेतला.