Unique Village In India Longwa Village Where People Crosses Borders Without Visa
भारताच्या सीमेवरील ‘हे’ गाव भन्नाट; खायचं एका देशात अन् झोपायचं दुसऱ्या देशात By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 06:43 PM2022-02-11T18:43:15+5:302022-02-11T18:48:50+5:30Join usJoin usNext तुम्हाला अशा घरात राहायचं आहे का? ज्यात तुमची बेडरुम एका देशात आणि किचन दुसऱ्या देशात असेल. विचारात पडला ना. अहो, ते स्वप्न नाही तर प्रत्यक्षात घडलंय. हे सत्य आहे नागालँडमधील एक लोंगवा गाव आहे. जे मोन जिल्ह्यातील सर्वात मोठ्या गावांमध्ये येते. राज्यातील उत्तरी भागात असलेल्या या गावातून भारत-म्यानमार सीमा रेषा जाते. लोंगवा गावातील नागरिकांना त्यामुळे दुहेरी देशाचं नागरिकत्व मिळालं आहे. त्यामुळे भारत असो वा म्यानमार या दोन्ही देशात या गावातील लोकं मुक्तपणे संचार करु शकतात. विशेष म्हणजे गावातील सरपंचाच्या घरातूनच सीमा गेली आहे. त्यामुळे सरपंचाचे घर दोन भागात विभागले आहे. एक भारतात आणि दुसरं म्यानमारमध्ये. गावकऱ्यांना देशाची सीमा ओलांडण्यासाठी कुठल्याही व्हिसाची आवश्यकता नसते. या गावातील गावकरी दोन्ही देशात फिरत असतात. कदाचित हे ऐकून तुम्ही हैराण व्हाल परंतु काही घरातील बेडरुम भारतात आणि किचन म्यानमार आहेत. म्यानमारच्या जवळ २७ कोन्याक गाव आहे. या गावातील काही युवक म्यानमार सैन्यातही सहभागी आहेत. लोंगवा गावातील लोकं कोन्याक जनजातीचे आहेत. ज्यांना हेडहंटर म्हणून ओळखलं जातं. १९६० च्या दशकात गावात शिकार करण्याची लोकप्रिय परंपरा होती. गावातील अनेक लोकांकडे पितळेच्या खोपडीनं बनलेले हार आहेत. ज्याला युद्धाच्या विजयाचं प्रतिक मानलं जातं. याठिकाणी राजाच्या ६० पत्नी होत्या. गावातील जे प्रमुख आहेत त्यांना ६० पत्नी आहेत. म्यानमार आणि अरुणाचल प्रदेशातील ७० हून अधिक गावांत त्यांचे प्रभुत्व आहे. त्याचसोबत अफीमचं सेवनही मोठ्या प्रमाणात केले जाते. जे शेती करत नाहीत ते म्यानमारच्या सीमेवर तस्करी करतात. पूर्वोत्तर भारतात फिरण्यासाठी सर्वात चांगली जागा तिच आहे. लोंगवा इथं शांत वातावरण आणि याठिकाणी हिरवळ लोकांचं मन जिंकते. नैसर्गिक सुंदरतेसोबतच लोंगवामध्ये नागालँड सायन्स सेंटर, डोयांग नदी, शिलोई सरोवर, हांगकांग मार्केट यासारखे अन्य पर्यटनस्थळ आहेत. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनकडून लोंगवा गावात सहज पोहोचता येते. हे गाव मोन शहरापासून ४२ किमी अंतरावर आहे. तुम्ही नागालँड स्टेट ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या बसने मोन जिल्ह्यात पोहोचू शकता आणि नंतर लोंगवाला कार भाड्याने घेऊ शकता. लोंगवा नागालँडच्या मोन जिल्ह्यातील घनदाट जंगलातील म्यानमार सीमेनजीकचं भारताचं अखेरचं गाव आहे. याठिकाणी कोंयाक आदिवासी राहतात. त्यांना क्रूर मानलं जातं. आपल्या गटाचं संरक्षण करण्यासाठी आणि सत्ता मिळवण्यासाठी ते नेहमी शेजारील गावांशी लढाई करतात. हे गाव दोन देशात कसं विभागलं याचं उत्तर अधिकाऱ्यांकडे नसल्याने ते सांगतात की, सीमा रेषा गावाच्या मध्यभागातून गेली आहे. परंतु कोंयाकवर त्याचा काही परिणाम नाही. बॉर्डर पिलरवर एकीकडे बर्मीज भाषेत आणि दुसरीकडे हिंदी भाषेत संदेश लिहिण्यात आला आहे.टॅग्स :भारतम्यानमारIndiaMyanmar