कधी शाळेची पायरीही चढली नाही; फक्त तानशाहासाठी देशात पिकवला जायचा भात, किम जोंग यांच्या रहस्यमय गोष्टी

By manali.bagul | Published: January 8, 2021 07:59 PM2021-01-08T19:59:33+5:302021-01-08T20:10:18+5:30

८ जानेवारी १९८३ ला जगातील सगळ्यात भयंकर तानशाहा किम जोंग ऊन यांचा जन्म झाला. दरवर्षी ८ जानेवारीला किम जोंग यांचा वाढदिवस साजरा केला जातो. या दिवशी संपूर्ण उत्तर कोरियात सरकारी सुट्टी घोषित केली जाते. अनेक वर्षांपासून तानशाहाने आपला वाढदिवस लोकांपासून लपवून ठेवला होता. २०१९ मध्ये चीनमुळे सगळ्यांनाच या तानशाहाचा वाढदिवस कळला. किम जोंगचा उत्तर कोरियामध्ये खूप दरारा आहे. त्यांनी तयार केलेले नियम तोडण्याची हिंमत कोणामध्येच नाही. आज आम्ही तुम्हाला या तानशाहाशी निगडीत काही गुप्त, माहित नसेल्या गोष्टींबाबत उलगडा करणार आहोत.

उत्तर कोरियाचा सर्वोच्च नेता बनण्यासाठी माणसाला बेकडू वंशाचं असावं लागतं. किम जोंग या वंशात जन्मले. १९९४ ते १९९४ पर्यंत किम इल सुंग यांनी देशावर राज्य केले. त्यानंतर त्यांचा मुलगा किम जोंग इल आला आणि १९९४ ते २०११ पर्यंत सत्ता सांभाळली.

त्यानंतर उत्तर कोरियाची सत्ता किम जोंग ऊन यांच्याकडे आली. वॉशिंग्टन पोस्टच्या बीजिंग ब्यूरोच्या प्रमुख अन्ना फिफील्ड यांच्या द ग्रेट सक्सेस द डिवाइनली परफेक्ट डेस्टीनी ऑफ ब्रिलियंट कॉमरेड किम जोंग ऊन नावाच्या पुस्तकात या तानशाहाबाबत अनेक गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे.

या पुस्तकात लिहिलेल्या माहितीनुसार किम जोंग कधीही आपल्या माहालाच्या बाहेर गेले नाहीत. त्यांना शाळेतही पाठवण्यात आलं नव्हतं. घरीत त्यांचा अभ्यास घेतला जात होता. किम यांना जी वस्तू आवडत नव्हती ती वस्तू माहालाच्या बाहेर फेकली जात होती.

त्यांच्या कुटुंबात कोणीही भात खात नव्हतं. पण किम यांना भात आवडायचा म्हणून देशात एका ठिकाणी त्यांच्यासाठी खास भातशेती केली जात होती.

किम यांचे कपडे ब्रिटिश फॅब्रिक्सचे असायचे. त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या जायच्या.

जेव्हा किम यांना दारूचे व्यसन लागले तेव्हा त्यांनी दोन दिवसात १०० कोटींची दारू प्यायली.

त्यांना लहानपणापासूनच हत्यारांची आवड होती. कमी वयातच त्यांच्या हातात पिस्तुल देण्यात आलं होतं. त्यांना वेगवेगळ्या कारर्स आवडायच्या.

किम यांना मशिन्सची माहिती घेण्याची आवड होती. त्यांनी मशीन एक्सपर्ट्सना बोलावून माहिती घेण्यास सुरूवात केली.