unusual temple in india and their mysterious power
भारतातील अजब मंदिरं पाहिलीत का? By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 04:07 PM2019-02-27T16:07:27+5:302019-02-27T16:17:31+5:30Join usJoin usNext भारत आपल्या संस्कृतीसाठी प्रसिद्ध असून येथे अनेक मंदिरं आहेत. स्थापत्यकलेचं वैभव असलेली मंदिरं पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने भारतात येतात. मात्र भारतात काही अजब मंदिरं आहेत त्याबाबत जाणून घेऊया. सोनिया गांधी मंदिर यूपीएच्या अध्यक्षा व काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचं देखील तेलंगणामध्ये एक मंदिर आहे. या मंदिरात सोनिया गांधी यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच या मंदिरात राजीव गांधी, इंदिरा गांधी यांच्या देखील मूर्ती आहेत.रॉयल इनफील्ड बाइक मंदिर राजस्थानच्या जोधपूरमध्ये एक असं मंदिर आहे ज्याचं नाव ऐकल्यावर नक्कीच आश्चर्य वाटेल. रॉयल इनफिल्ड बाइकचं एक मंदिरं आहे. 1988 मध्ये ओम सिंह राठोर या व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या रॉयल इनफील्ड बाइकचं मंदिर तयार करण्यात आलं. चायनीज काली मंदिर कोलकातामध्ये एक चायनीज काली मंदिर आहे. या मंदिरामध्ये चायनीज पुजारी काली मातेची पूजा करतात. तसेच या मंदिरात न्यूडल्सचा प्रसाद दिला जातो. मंकी टेंपल जयपूरमधील मंकी टेंपल हे देशात प्रसिद्ध आहे. या मंदिरात अनेक माकडांचा वावर आहे. मंकी टेंपल लोकप्रिय असल्याने अनेक लोक या मंदिराला भेट देत असतात.करणी माता मंदिर राजस्थानच्या बीकानेरमधील करणी माता मंदिर अत्यंत लोकप्रिय आहे. या मंदिरात जवळपास 25 हजारांहून अधिक उंदीर आहेत. तसेच काही पांढरे उंदीर देखील आहेत. पांढरे उंदीर दिसणं हे भाग्यशाली मानलं जात असल्याने अनेक जण या मंदिरात येतात.काल भैरव मंदिर उज्जैन येथील काल भैरव मंदिर हे अनोख्या परंपरेसाठी प्रसिद्ध आहे. येथे प्रसाद म्हणून दारू दिली जाते. टॅग्स :ट्रॅव्हल टिप्सपर्यटनTravel Tipstourism