हिंदू विवाहित मुलीचं मुस्लिम मुलाशी लावून दिलं आईने लग्न, वाद पेटला अन् नवरी-नवरदेव दोघेही फरार.... By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 01:24 PM 2021-03-08T13:24:49+5:30 2021-03-08T13:44:29+5:30
Muslim Men married to Hindu women in Meerut : असे सांगितले जात आहे की, एक ऑटो ड्रायव्हर चांद खान याने दुसऱ्या धर्माच्या मुलीसोबत लग्न केलं. यासाठी मॅजिस्ट्रेटची परवानगी घेतली गेली नाही. याबाबत एसपी सिटी विनीत भटनागर यांनी सांगितले की, या व्हिडीओत दोन लोकांचं लग्न होताना दिसत आहे. व्हिडीओत एक पुरोहित आहे आणि इतरही काही लोक आहेत. असे सांगितले जात आहे की, मुलीचं आधीच लग्न झालं होतं. मुलीच्या आईने तिचं लग्न दुसऱ्या मुलाशी लावून दिलं होतं.
असे सांगितले जात आहे की, एक ऑटो ड्रायव्हर चांद खान याने दुसऱ्या धर्माच्या मुलीसोबत लग्न केलं. यासाठी मॅजिस्ट्रेटची परवानगी घेतली गेली नाही.
अग्नीपात्रात अग्नी लावून सप्तपदी झाली आणि कुणीतरी याचा व्हिडीओ व्हायरल केला. मात्र, लग्नानंतर नवरी आणि नवरदेव दोघेही फरार झाले आहेत. सोबत मुलीचे कुटुंबियही फरार आहेत.
असाही आरोप आहे की, मुलीच्या आईने त्यांना धमकी दिली होती की, जर लग्न लावून दिलं नाही तर ती त्यांच्यावर केस करेल. आता हे प्रकरण पोलिसात गेलं असून त्यांनी तपास सुरू केला आहे. मात्र, त्यानंतर मुलगा, मुलगी आणि मुलीच्या घरचे लोक फरार आहेत.
असे सांगितले जात आहे की, या मुलीचं लग्न काही महिन्यांपूर्वीच दुसऱ्या तरूणासोबत झालं होतं. मात्र, तिचं प्रेमप्रकरण त्याला समजलं आणि दोघात वाद होऊ लागले होते. अशात ती माहेरी परतली होती.
शनिवारी श्रद्धा पुरी डबल स्टोरी भागात चांद खान याने हिंदू रितीरिवाजाप्रमाणे लक्ष्मीसोबत लग्न केलं. त्यांनी अग्नीभोवती सप्तपदीही घेतली. त्यांचा सप्तपदीचा व्हिडीओही व्हायरल झाला.
आरोप आहे की, हे लग्न मॅजिस्ट्रेटची परवानगी न घेताच लावण्यात आलं. तेच लग्नानंतर नवरी-नवरदेव दोघेही फरार आहेत. आता या घटनेवर कारवाईची मागणी केली जात आहे. काही संघटनांनी पोलीस स्टेशनमध्ये धिंगाणा घातला. त्यांनीच तक्रार नोंदवली आणि कारवाईची मागणी केली.
याबाबत चांद खानच्या परिवाराने सांगितले की, ते या लग्नाविरोधात होते. पण मुलीची आईनेच मुलावर आणि मुलाच्या परिवारावर या लग्नासाठी दबाव टाकला. मुलाच्या घरातील लोक म्हणाले की, मुलीच्या आईने आणि त्यांच्या काही लोकांनी जबरदस्ती हे लग्न लावून दिलं.
असाही आरोप आहे की, मुलीच्या आईने त्यांना धमकी दिली होती की, जर लग्न लावून दिलं नाही तर ती त्यांच्यावर केस करेल. आता हे प्रकरण पोलिसात गेलं असून त्यांनी तपास सुरू केला आहे. मात्र, त्यानंतर मुलगा, मुलगी आणि मुलीच्या घरचे लोक फरार आहेत.
याबाबत एसपी सिटी विनीत भटनागर यांनी सांगितले की, या व्हिडीओत दोन लोकांचं लग्न होताना दिसत आहे. व्हिडीओत एक पुरोहित आहे आणि इतरही काही लोक आहेत. असे सांगितले जात आहे की, मुलीचं आधीच लग्न झालं होतं. मुलीच्या आईने तिचं लग्न दुसऱ्या मुलाशी लावून दिलं होतं.
आता यात ती पुन्हा दुसऱ्या धर्माच्या मुलाशी लग्न करत आहे. जे फरार आहेत त्यांचा शोध घेणं सुरू आहे. तर यात कोणत्याही प्रकारचा गुन्हा आढळला तर कायदेशीर कारवाई केली जाईल. जर कुणी आरोप लावला तर नक्की कारवाई केली जाईल.