Village Located at most Dangerous place in world
'या' गावातील माणसं जीव मुठीत घेऊन जगतात, कारण... By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 03:00 PM2019-06-25T15:00:49+5:302019-06-25T15:03:38+5:30Join usJoin usNext जगात असे खूप माणसं असतात ज्यांना उंचावरील ठिकाणावर राहण्यास आवडतं. मात्र काही ठिकाणं अशी असतात जिथे राहणं एकदम कठीण असतं. त्याठिकाणी तुमची एक छोटीशी चूकही तुम्हाला महागात पडू शकते. स्पेनमधील या जागेला केस्टेलफोलिट डे ला रोका या गावाच्या नावाने ओळखलं जातं. केस्टेलफोलिट डे ला रोका हे गाव फ्लूविया आणि टोरोनल या दोन नद्यांच्यामध्ये वसलेले आहे. उभ्या डोंगर कडेकपाऱ्यात जमिनीपासून जवळपास 50 मीटर उंचीवर वसलेलं हे गाव नैसर्गिक संपत्तीने नटलेले आहे. सांगितले जाते की, लाखो वर्षापूर्वी याठिकाणी दोन ज्वालामुखी विस्फोट झाले होते. ज्या कारणामुळे येथे हळूहळू डोंगर तयार झाले. मध्य युगकाळात केस्टेलफोलिट डे ला रोका हे गाव वसलं. या गावातील जुनी घरं ज्वालामुखीपासून बनलेल्या डोंगरापासून तयार झालीत. याठिकाणी 13 व्या शतकात सेंट साल्वाडोर चर्च आहे. येथील घरं डोंगराच्या कडेकपाऱ्यावर असल्याने धोकादायक चित्र दिसतं. जर तुमच्याकडून थोडीही चूक झाली तरी तुमचा जीव धोक्यात येऊ शकतो. अशा घरांच्या दुरुस्तीचं काम करताना जीव मुठीत घेऊन करावं लागतं. मात्र अनेक वर्षापासून याठिकाणी लोक राहतात.