फक्त एका फ्लॅटच्या किमतीत विकलं जातंय गाव, कारण ऐकुन उडेल झोप By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 07:12 PM 2021-07-05T19:12:11+5:30 2021-07-05T19:26:21+5:30
काही गोष्टींमुळे ज्या वस्तूची किंवा जागेची किंमत जास्त आहे ती नगण्य होऊ शकते. कितीतरी बहुमोलाच्या जमिनी अगदी कवडीमोलात विकल्या जातात. स्कॉलंडच्या एका गावची परिस्थीती अशीच झाली आहे. तिथे एक असं गाव आहे जे तेथील एका इमारतीमधील फ्लॅटच्या किमतीत विकलं जातंय. तेथील घरांचे मालक तर वाट बघतायत की हे गाव कधी विकलं जातंय. का बरं? घ्या जाणून... स्कॉटलंडच्या पर्थशायरमधील लोच ते येथे हे गाव आहे. मात्र हे गाव सध्या विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहे. मात्र कोणीच हे गाव घ्यायला धजावत नाहीये.
मेट्रो डॉट कॉम नुसार हे गाव इतकं सुंदर आहे की इथे आल्यावाचून तुम्हाला राहवणार नाही.
इथे एक प्रायव्हेट बीच आहे जिथे जाऊन तुम्ही फिशिंग करू शकता.
या गावात लाकडाची जुन्या पद्धतीची आकर्षक घरे आहेत. मात्र तरीही या गावात कुणी पाय ठेवायला तयार नाही.
असं म्हटलं जात की येथे भुताची दहशत आहे. तेथील लोक असं म्हणतात की येथे त्या गावच्या शेवटच्या मालकीणीचं भूत आहे. जिला येथील लोक लेडी ऑफ लॉर्सही म्हणतात.
असं म्हणतात या स्त्रीने येथे भविष्यवाणी केली होती. ती सर्व खरी झाली. त्यामुळे आता या गावात यायला कुणी धजावत नाही.
या गावात जर कुणाला राहायचं असेल तर त्याला एका इमारतीच्या फ्लॅट इतकी नगण्य किंमत मोजावी लागेल. या किमतीतच ती व्यक्ती अख्ख गाव खरेदी करू शकते.
येथील ३.३१ एकर जमिनीची किंमत १.२९ करोड ठेवली गेलीय.
तुम्हाला येथे एक गिरणी, एक भट्टी आणि काही घर मिळतील.
हे गाव २०१६ साली १ करोड रुपयात विकले गेले होते.