मानलं गड्या! नोकरी सोडली अन् युट्यूबची आयडीया घेऊन शेती केली, आता घेतोय लाखोंची कमाई By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 03:29 PM 2021-02-11T15:29:53+5:30 2021-02-11T15:52:31+5:30
Inspirational Story of farmers : १०० किलोंपेक्षा जास्त (saffron) केशराच्या बियांची लागवड करण्यात आली होती. त्यात दीड किलोंपेक्षा जास्त केशराचं पीक घेता आलं. हरियाणातील हिसारच्या दोन तरूण शेतकऱ्यांनी आपल्या घराच्या छतावर केसरची शेती करून सगळ्यांना अचंबित केलं आहे. कारण केशराची शेती फक्त जम्मू काश्मिरमध्येच केली जाते. पण या शेतकऱ्यांनी एयरोफोनिक मार्गानं शेती तरून जवळपास ६ ते ९ लाखांपर्यंत उत्तन्न घेतलं आहे. यामुळे सगळेचण अवाक् झाले आहेत.
लॉकडाऊनदरम्यान शक्कल लढवून दोघांनी ही कमाल केली. आता ऐयरोफोनिक पद्धतीनं इराण, स्पेन आणि चीनमध्ये ही पीकं घेतली जात आहेत. संपूर्ण देशात तसंच परदेशात जम्मू येथून केशराचा पुरवठा केला जातो. पण शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहनत आणि निष्ठेने कोणतंही काम केल्यास ते अधिक सोपं होतं.
कोलकात्यातील रहिवासी असेलेले नवीन आणि प्रवीण या दोन्ही भावंडांनी केशराच्या शेतीची पूर्ण माहिती गुगल आणि युट्यूबच्या माध्यमातून मिळवली. केशराच्या बीया २५० रुपये प्रति किलोनं जम्मू येथून आणण्यात आल्या.
कोलकात्यातील रहिवासी असेलेले नवीन आणि प्रवीण या दोन्ही भावंडांनी केशराच्या शेतीची पूर्ण माहिती गुगल आणि युट्यूबच्या माध्यमातून मिळवली. केशराच्या बीया २५० रुपये प्रति किलोनं जम्मू येथून आणण्यात आल्या. आजाद नगर येथील १५ बाय १५ च्या खोलीच्या छतावर चाचणी पूर्ण करून शेती करायला सुरूवात केली. हा उपक्रम नोव्हेंबर २०२० मध्ये पूर्ण झाला.
चाचणीदरम्यान १०० किलोंपेक्षा जास्त केशराच्या बियांची लागवड करण्यात आली होती. त्यात दीड किलोंपेक्षा जास्त केशराचं पीक घेता आलं. सुरूवातीला ६ ते ९ लाखांचा फायदा झाला. बाजारात केशर अडीच तीन लाख किलोनं मिळते.
नवीन आणि प्रवीण यांनी या प्रोजेक्टबद्दल सांगितले की, ७ ते १० लाख रुपये गुंतवून कोणीही या शेतीवर काम करू शकते. ज्यात वेगवेगळ्या प्रकारच्या मशिन्सचा समावेश असेल. एका वर्षात १० ते २० लाखांपर्यंत नफा कमावता येऊ शकतो. या कामासाठी त्यांनी नोकरीसुद्धा सोडली आहे.
एकदा लावणी करून शेतकरी ५ वर्षांपर्यंत केशराचं पीक घेऊ शकतात. कारण या शेतीसाठी जास्त कामगारांची आवश्यकता नसते. एकटा व्यक्तीसुद्धा ही शेती करू शकतो.
या शेतीसाठी २० डिग्री आणि रात्री १० डिग्री तापमान असायला हवं. या पिकांवर सुर्यप्रकाश तिरप्या पद्धतीनं यायला हवा. सुर्यप्रकाश नसल्यास लाईट्सचा वापर केला जाऊ शकतो. बॅक्टेरिया फ्री लॅब असायला हवी किंवा थर्माकोलचा वापर तुम्ही करू शकता.
केशरच्या फुलानं साबण, फेस मास्क, यासह इतर अन्य सामान तयार केला जाऊ शकतो. केसर हे हायपर टेंशन, खोकला, चक्कर येणं, कॅन्सर तसंच गर्भवती महिलांसाठी, वयस्कर लोकांसाठी, डोळ्यांसाठी, हृदयासाठी फायदेशीर ठरते.
या भावंडांनी हरियाणा सरकारकडून मागणी केली आहे की त्यांना केशराच्या शेतीसाठी सब्सिडी दिली जावी. ज्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्या बळकट होतील. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जर कोणालाही केशराची शेती करायची असेल तर त्यांना या दोन भावंडांशी संपर्क साधता येईल.