खरं की काय? फक्त ८५ रुपयात 'या' कोरोनामुक्त गावात घर विकत घेऊ शकता, 'अशी' आहे खासियत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2020 06:01 PM2020-08-02T18:01:30+5:302020-08-02T18:45:25+5:30

कोरोना व्हायरसने भारतासह संपूर्ण जगभरात हाहाकार निर्माण केला आहे. चीनमधून पसरलेल्या कोरोनाच्या माहामारीने जगभरातील लोकांना आपल्या जाळ्यात ओढलं आहे. इटलीतील सिंक्यूफोंडी या गावातील मेअर मिशेल कोनिया यांनी दिलेल्या माहितीनुसार या गावात आतापर्यंत एकही कोरोना रुग्ण सापडलेला नाही. स्वस्त घरांच्या किंमतीबाबत त्यांनी सांगितले की, लोकसंख्या वाढवण्यासाठी अशा किमती ठेवल्या आहेत.

सिंक्यूफोंडी गाव समुद्रापासून १० मिनिटांच्या अंतरावर आहे. याठिकाणी अनेक पर्यटक येतात. या ठिकाणी घर विकत घेत असलेल्या व्यक्तीला काही अटी मान्य कराव्या लागतात.

त्या अटी म्हणजे नेहमी घर स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवणं, वेळोवेळी घराला रंग देणं या गोष्टी घरमालकाने करायला हव्यात. या गावात चर्च आणि ऐतिहासिक इमारती मोठ्या संख्येनं आहेत.

या ठिकाणच्या घरांची किंमत फक्त 85 रुपये इतकी आहे. घर विकत घेतल्यानंतर वर्षाला 280 रुपयांचा वीमा काढावा लागतो.

घर विकत घेतल्यानंतर 3 वर्षांच्या आत डागडुजी, नुतनीकरण करण्यात आलं नाही तर 22000 डॉलर म्हणजेच ( जवळपास 16,43,943 रुपये) दंड भरावा लागतो. या गावातील इतर घर खुपच सुंदर आहेत.

या ठिकाणच्या रहिवाश्यांनी घरं खूपच सुंदर सजवलेली आहेत. घराच्या शिंड्यांनाही आकर्षक रंग दिला आहे. चारही बाजूंनी हिरवळ असल्यामुळे नैसर्गिक सुंदरतेने बहरलेलं असं हे गाव असून पर्वतांच्या खाली वसलेलं हे गाव आहे. तरिही इतक्या कमी किंमतीत का घरं विकली जातात याबाबत सगळ्यांनाच आश्चर्य वाटते.