Vojin Kusic Spinning House: पत्नीला वैतागलेल्या पतीनं लढवली शक्कल, सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 14:35 IST2021-10-11T14:26:57+5:302021-10-11T14:35:28+5:30

नवरा-बायकोचं नातंच मजेशीर असतं, जेवढं प्रेमाचं तेवढंच भांडणाचं. त्यामुळे, या नात्यावरुन सोशल मीडियावर अनेकदा विनोद शेअर केले जातात. तर, अनेकदा भांडणाचे व्हिडिओही व्हायरल होतात.

कधी कधी पतीसाठी आपल्या जीवाची बाजी लावणारी पत्नीही दिसते, तर कधी पत्नीसाठी आपलं सर्वस्व पणाला लावणारा पतीही दिसतो. त्यामुळेच, या नात्याचं वेगळंच बंधन आहे.

पत्नीसाठी, गावासाठी डोंगर खोदून रस्ता उभारणारा दशरथ मांझी आपण पाहिला आहे, चित्रपटातूनही तो घराघरात पोहोचला आहे. आता, अशाच एका पतीची ओळख तुम्हाला होणार आहे.

एका पतीने पत्नीला वैगातून असं काही काम केलंय, की सोशल मीडियावर ते चांगलंच व्हायरल होत आहे. वॉजिन क्यूसिक असं या पतीचं नाव असून त्यानं पत्नीसाठी चक्क फिरतं घर बनवलं आहे.

सर्वात कमी गतीने 24 तासांत हे घर एक संपूर्ण चक्कर पूर्ण करते. तर, सर्वात वेगवान गतीने हे घर 22 सेकंदात पूर्णपणे फिरते.

उत्तरी बोस्निया येथील सर्बैक शहरात हे घर वसलेलं आहे, या घरातून एक क्षणात पत्नीला सुर्योदय पाहता येईल. पतीने हे घर का बनवले, हाच प्रश्न सर्वांना पडला आहे.

वॉजिक यांच्या पत्नीला घरातूनच विविध ठिकाणं पाहण्याचा छंद होता. तसेच, पत्नीच्या या छंदाला पूर्ण करण्यासाठी घराचे सातत्याने रिनोव्हेशन करण्यापासून थकलो होतो.

म्हणून मी पत्नीच्या आवडता छंद पूर्ण करण्यासाठी हे फिरते घर बनविल्याचे वॉजिक यांनी म्हटले. हे घर बनविण्यासाठी त्यांना तब्बल 6 वर्षांचा कालावधी लागला आहे.

अमेरिकन निकोला टेस्ला आणि मिहाज्लो पुपिन यांच्याकडून हे घर बनविण्याची प्रेरणा मिळाल्याचं 72 वर्षीय क्यूसिस यांनी सांगितलं आहे.