weird etiquette and habits of japanese
...म्हणून जपानी ठरतात जगावेगळे By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 06:55 PM2019-04-09T18:55:55+5:302019-04-09T19:00:26+5:30Join usJoin usNext जपानी माणसं व्हिजिटिंग कार्ड देताना दोन्ही हातांचा वापर करतात. कार्ड घेतल्यानंतर काही सेकंद त्याकडे पाहतात. ते लगेच खिशात किंवा कार्ड होल्डरमध्ये ठेवत नाहीत. लिफ्टमध्ये शिरणाऱ्या पहिल्या व्यक्तीला लिफ्ट इन्चार्जची जबाबदारी पार पाडावी लागते. सर्व व्यक्ती आतमध्ये येईपर्यंत लिफ्टचे दरवाजे खुले राहतील, याची काळजी घ्यावी लागते. जपानच्या मेट्रोमधून प्रवास करताना काही नियम पाळावे लागतात. तुम्ही प्रवासादरम्यान बोलू शकत नाही. फोनवर बोलणंदेखील चुकीचं समजलं जातं. याशिवाय कोणाकडे पाहणंदेखील चांगलं मानलं जात नाही. जपानमधील काही शहरांची लोकसंख्या प्रचंड आहे. या शहरांमधील मेट्रो स्टेशनांवर खूप गर्दी असते. अशावेळी मेट्रोमध्ये चढणाऱ्या प्रवाशांना धक्का देण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. प्रवाशांना आत ढकलून मेट्रोचे दरवाजे बंद व्हावेत, ही जबाबदारी या कर्मचाऱ्यांकडे आहे. पाश्चात्य देशांमध्ये सार्वजनिक ठिकाणी किस करणं सामान्य मानलं जातं. मात्र 1945 पासून जपानमध्ये असं करण्यास बंदी घालण्यात आली आहे. दुसऱ्यांना आपल्याकडील पैसे दाखवणं जपानी लोकांना आवडत नाही. त्यामुळे पैसे देण्यासाठी त्यांच्याकडून विविध प्रकारच्या लिफाफ्यांचा वापर केला जातो. जपानी लोकांची बसण्याची पद्धत अतिशय आकर्षक आहे. त्यांच्या बसण्याच्या पद्धतीला सीझ म्हटलं जातं. पाय गुडघ्यात दुमडून जपानी लोक तासनतास कोणत्याही अडचणीशिवाय बसतात. जपानी व्यक्ती समोरच्या व्यक्तीबद्दल सन्मान दर्शवण्यासाठी अभिवादन करतात. 15 अंशांमध्ये झुकून केलं जाणारं अभिवादन सामान्य असतं. बॉस किंवा शिक्षकांना 30 अंशांत झुकून अभिवादन केलं जातं. तर माफी मागताना 45 अंश झुकतात. टॅग्स :जपानJapan