weird traffic rules in world
वाहतुकीचे हे अजब नियम पाहून, तुम्ही नक्कीच जाल चक्रावून! By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 02:41 PM2018-10-23T14:41:32+5:302018-10-23T14:45:04+5:30Join usJoin usNext कोस्टारिकामध्ये तुम्ही मद्यपान करुन गाडी चालवू शकता. मात्र पोलीस तपासणीत तुम्ही मद्यधुंद अवस्थेत आढळता कामा नये. त्यामुळे दारु पिण्यावर कंट्रोल ठेवल्यास कोस्टारिकात तुम्ही गाडी चालवू शकता. स्पेनमध्ये गाडी चालवताना एक एक्स्ट्रा चष्मा गरजेचा आहे. त्यामुळे डोळ्यावर आणि कारमध्ये एक असे दोन चष्मे गाडी चालवताना आवश्यक आहेत. सायप्रसमध्ये गाडी चालवताना काहीही खाता किंवा पिता येत नाही. कारण तसं करणं बेकायदेशीर आहे. या नियमाचं उल्लंघन केल्यास 6 हजार रुपये दंड होऊ शकतो. जर्मनीच्या एका भागात अजब नियम आहे. याठिकाणी तुम्हाला रस्त्यावर गाडी थांबवता येत नाही. त्यामुळे पेट्रोल, डिझेल संपलं तर याठिकाणी चालकाला गाडी ढकलावी लागते. कारण गाडी एका जागेवर उभं करणं हा इथे गुन्हा समजला जातो. स्वीडनमध्ये दिवसादेखील गाडीच्या हेडलाईट्स सुरुच ठेवाव्या लागतात. अन्यथा कारवाई होते. पावसात पादचाऱ्यांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागतो. एखाद्या गाडीनं चिखल उडवला तर काय, अशी भीती मनात असते. मात्र ऑस्ट्रेलियाच्या नू साऊथ वेल्समध्ये परिस्थिती उलट आहे. याठिकाणी चिखल उडाल्यास चालकाला 1 लाख 40 हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. कधीकधी अनेकजण घरातून फार तयार न होताच शॉर्ट्सवर बाहेर पडतात. मात्र कॅलिफोर्नियातल्या महिलांना तसं करता येत नाही. या ठिकाणी हाऊसकोट घालून महिला गाडी चालवू शकत नाहीत. टॅग्स :रस्ते वाहतूकरस्ते सुरक्षाroad transportroad safety