What happens with human after death hiker said after dead for 45 mins
चमत्कार! ४५ मिनिटांनी 'असा' जीवंत झाला मेलेला माणूस; अन् डॉक्टरांना सांगितला अनुभव.... By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2020 06:44 PM2020-11-16T18:44:42+5:302020-11-16T18:53:34+5:30Join usJoin usNext मेल्यानंतर काय होतं? आपण कोणत्या दुनियेत असतो ते जाणून घेण्याची उत्सूकता प्रत्येकालाच असते. आतापर्यंत या प्रश्नाचं उत्तर कोणालाही सापडलेलं नाही. ४५ वर्षांच्या मायकल नॅपिन्स्की या माणसाला एक वेगळाच अनुभव आला आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार मेल्यानंतर ४५ मिनिटांनी हा माणूस पुन्हा जीवंत झालाआहे. मेल्यानंतर कोणी जीवंत झालंय असं तुम्ही याआधी कधीही पाहिलं नसेल तर पण प्रत्यक्षात असा प्रकार घडला आहे. इतकंच नाही तर डॉक्टरांनी सुद्धा सांगितले की, या माणसाचे ४५ मिनिटांत एकदाही हृदयाचे ठोके सुरू असल्याचे जाणवले नाही. या माणसाचे नातेवाईक मायकलचा मृत्यू झाल्याने दुःखी झाले होते. मायकलच्या जीवंत होण्याने ते आश्चर्यचकित झाले. ४५ वर्षाच्या मायकल नपिन्स्कीने ७ नोव्हेंबरला माऊंट रेनिअर नॅशनल पार्कमध्ये होते. यादरम्यान जास्त बर्फ असल्यामुळे त्यांची त्यांच्या मित्रांपासून ताटतूट झाली. जेव्हा पर्वतावरून मायकल परत आले नाही. तेव्हा रेस्क्यू टीम पाठवण्यात आली. बर्फाच्या पर्वतांवर मायकलची शोध सुरू झाला. त्यानंतर एका दिवसानंतर रेस्क्यू टीमला मायकल मृतावस्थेत दिसून आले. हॅलिकॉप्टरच्या माध्यमातून मायकलला बाहेर काढण्यात आलं. या दरम्यान डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मायकल मृत असल्याचे घोषित करण्यात आले. जवळपास ४५ मिनिटांपर्यंत ही व्यक्ती मृत होती. त्यानंतर डॉक्टरांनी एक्स्ट्राकोर्पोरियल झिल्ली ऑक्सीजनेशन (ईसीएमओ) मशिनपर्यंत पोहोचवले. तरीही डॉक्टरांनी हार न मानता मेलेल्या माणसाला जीवंत करून दाखवले. डॉक्टरांसोबत मायकल यांचे नातेवाईकसुद्धा या घटनेने हैराण झाले होते. मायकलने पुन्हा जीवंत झाल्यानंतर सांगितले की, मृत्यूच्या तोंडातून बाहेर येणं हे एक भयानक स्वप्नाप्रमाणे होते. डॉक्टरांनी मला नवीन जीवदान दिलं आहे. आता मी हे जीवन इतरांना समर्पीत करू इच्छितो. एक्स्ट्राकोर्पोरियल झिल्ली ऑक्सीजनेशन (ईसीएमओ) याच्या साहाय्याने रक्त शरीरातील हृदय, फ्फुफुसंच्या बाहेर मशिनने पंप केलं जातं. याद्वारे कार्बन डायऑक्साईड निघून शरीरात ऑक्सिजनने भरलेले टिश्यूज पाठवले जातात. कोरोनाच्या अनेक रुग्णांच्या उपचारांसाठी या पद्धतीचा वापर केला जात आहे. ही खूप महागडी आणि जोखिमीची ट्रिटमेंट आहे. अमेरिकेतील जवळपास २६४ रुग्णालयांमध्येही मशिन आहे. टॅग्स :जरा हटकेमृत्यूJara hatkeDeath