काय आहे हे गुलाबी पावडर जे विमानानं अमेरिकेतील जंगलात आग विझवण्यासाठी वापरलं गेलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 16:43 IST2025-01-14T16:27:37+5:302025-01-14T16:43:35+5:30

काही व्हिडीओ असेही होते ज्यात विमानातून एक गुलाबी लिक्विडही फेकलं जात असल्याचं दिसलं. त्यामुळे हे गुलाबही लिक्विड काय आहे?

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधील आग विझवण्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यात विमानातून पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सोबतच काही व्हिडीओ असेही होते ज्यात विमानातून एक गुलाबी लिक्विडही फेकलं जात असल्याचं दिसलं. त्यामुळे हे गुलाबही लिक्विड काय आहे? असा प्रश्न लोकांना पडला आहे.

हे पिंक लिक्विड म्हणजे पिंक फायर रिटार्डेंट केमिकलचं मिश्रण आहे. जे आग विझवण्याच्या आणि पसरणं थांबवण्याच्या कामी येतं. यासाठी सगळ्यात जास्त वापरलं जाणारं प्रोडक्ट फोस-चेक आहे, जे अमोनियम फॉस्फेटपासून तयार एक सॉल्यूशन असतं.

आग लागल्यावर पिंक फायर रिडार्डेंट केमिकल झाडाझुडपांवर शिंपडलं जातं. अमोनियम पॉलीफॉस्फेटपासून हे बनत असल्यानं ते सहजपणे वाफेत बदलत नाही आणि जास्त काळ टिकून राहतं. हे शिंपडल्यावर झाडांवर एक थर तयार होतो. ज्यामुळे त्यात ऑक्सीजनचा सप्लाय बंद होतो आणि झाडं जळण्यापासून वाचतात.

मुळात फायटर रिटार्डेंटमध्ये गुलाबी रंग वेगळा मिक्स केला जातो. कारण फायर फायटर्सना तो स्पष्टपणे दिसावा. या केमिकलमध्ये गुलाबी रंग मिक्स करण्याचं आणखी एक कारण म्हणजे डोळ्यांनी बघायलाही चांगला वाटतो.

पर्यावरण तज्ज्ञांचं मत आहे की, पिंक फायर रिटार्डेंटचा वापर खर्चीक तर आहेच, सोबतच पर्यावरणासाठीही नुकसानकारक आहे. २०२४ मध्ये साऊथ कॅलिफोर्निया यूनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांकडून करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये आढळलं की, फोस-चेकमध्ये आरोग्य खराब करणारे अनेक टॉक्सिक मेटल आहेत, ज्यात कॅडमियम आणि क्रोमिअमसारखे केमिकल्स असतात. हे केमिकल्स हवेत मिसळ्यानंतर कॅन्सर, हार्ट, लिव्हर आणि किडनीसंबंधी समस्या होऊ शकतात.

फॉस-चेक आग विझवण्यासाठी केल्या जाणाऱ्या अनेक उपायांपैकी एक आहे. हा किती प्रभावशाली आहे याबाबत मतभेद आहेत. एका आकडेवारीनुसार, अमेरिकेत २००९-२०२१ दरम्यान ४४ कोटी गॅलनपेक्षा जास्त रिटार्डेंट शिंपडण्यात आलं. तसेच 'न्यू यॉर्क टाइम्स' च्या एका रिपोर्टनुसार, वन वैज्ञानिकांना त्यांच्या रिसर्चमध्ये आढळलं की, कोणत्याही ठिकाणचं वातावरण, तेथील चढउतार आणि ईंधनाच्या प्रकारावर हे अवलंबून असेल की, हा उपाय किती प्रभावी ठरेल.