कोणत्या देशात घेतलं जातं मिठाचं सगळ्यात जास्त उत्पादन? भारत कोणत्या नंबरवर?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 03:41 PM2024-12-11T15:41:27+5:302024-12-11T15:58:50+5:30

तुम्हाला माहीत आहे का की, जगात सगळ्यात जास्त मिठाचं उत्पादन कुठे घेतलं जातं? नसेल माहीत तर तेच जाणून घेऊया.

मीठ आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे. मिठाने केवळ पदार्थांची टेस्टच वाढत नाही तर ते आपल्या शरीरासाठीही महत्वाचं आहे. रोज तुम्हीही मिठाचं सेवन करतच असाल. पण तुम्हाला माहीत आहे का की, जगात सगळ्यात जास्त मिठाचं उत्पादन कुठे घेतलं जातं? नसेल माहीत तर तेच जाणून घेऊया.

जगात अनेक देश मिठाची निर्मिती करतात. पण काही प्रमुख देश असे आहेत जे मिठाची निर्मिती मोठ्या प्रमाणात करतात. जाणून घेऊ या देशांची नावे आणि भारत यात कोणत्या नंबरवर आहे.

मिठाची निर्मिती करणाऱ्या देशांच्या यादीत सगळ्यात पहिल्या क्रमांकावर चीनचं नाव आहे. चीन समुद्रातील पाण्याच्या बाष्पीभवनातून सगळ्यात जास्त मीठ तयार करतो.

त्यानंतर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर अमेरिकेचं नाव आहे. अमेरिका जगातील प्रमुख मीठ उत्पादक देशांपैकी एक आहे. अमेरिकेत मिठाची निर्मिती समुद्राच्या पाण्यासोबतच खनिज जमावातूनही केली जाते.

भारत हा जगातील तिसरा सगळ्यात मोठा मीठ उत्पादक देश आहे. गुजरात राज्य मीठ उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. त्याशिवाय ऑस्ट्रेलियातही मिठाचं भरपूर उत्पादन घेतलं जातं.

तसेच या यादीत पाचव्या क्रमांकावर जर्मनीचं नाव येतं. जर्मनीमध्ये खनिज जमावाच्या माध्यमातून मिठाची निर्मिती केली जाते.

मिठाची निर्मिती वेगवेगळ्या पद्धतीने केली जाऊ शकते. पण सगळ्यात कॉमन पद्धत समुद्राच्या पाण्यापासून तयार करणे ही आहे. या प्रक्रियेत समुद्राचं पाणी तलावात किंवा वाफ्यांमध्ये जमा केलं जातं. नंतर सूर्याच्या तापमानामुळे भाष्पीभवन होतं आणि मीठ तयार होतं.