कोंबडा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे? अनेकांना माहीत नसेल याचं उत्तर... By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 04:11 PM 2024-09-14T16:11:23+5:30 2024-09-14T16:49:01+5:30
National Bird : भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे. पण तुम्हाला क्वचितच कुणाला माहीत असेल की, कोंबडा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे. सामान्य ज्ञान हे आपल्या एकंदर विकासासाठी, एखाद्या परीक्षेत पास होण्यासाठी किंवा नोकरीच्या एखाद्या मुलाखतीसाठी किती महत्वाचं असतं. वेगवेगळ्या नोकरींच्या परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान फार महत्वाचं असतं. त्यामुळे आपल्याला अनेक गोष्टी माहीत असणं गरजेचं असतं.
जनरल नॉलेजने आपलं ज्ञान वाढवण्यास मदत मिळते. आपल्याला देशातील-परदेशातील माहिती मिळते. अशात वेगवेगळी माहिती असल्याने मित्र परीवारातही सन्मान वाढतो.
तुम्हाला हे माहीत आहेच की, प्रत्येक देश त्यांचा एक राष्ट्रीय पक्षी, एक राष्ट्रीय प्राणी निवडतात. भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे. पण तुम्हाला क्वचितच कुणाला माहीत असेल की, कोंबडा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे.
याचच उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. याचं उत्तर आहे आपला शेजारी देश श्रीलंका. येथील राष्ट्रीय पक्षी श्रीलंकाई जंगल फाउल म्हणजे जंगली कोंबडा आहे.
आधी याला सीलोन जंगलफाउल म्हटलं जात होतं. हा पक्षी केवळ श्रीलंकेच्या वेगवेगळ्या जंगलांमध्ये आढळतो. हा पक्षी कोंबड्याची एक प्रजाती आहे. जंगली कोंबडे हे शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही असतात. या जंगली कोंबड्यांची लांबी जवळपास ३५ सेमी आणि वजन ५१० ते ६४५ ग्रॅम असतं.
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, श्रीलंकेसोबतच यूरोपीयन देश फ्रान्सचा देखील राष्ट्रीय पक्षी कोंबडा आहे. इथे गॅलिक रूस्टर म्हणजे एक प्रकारच्या जंगली कोंबड्याला राष्ट्रीय पक्षी बनवलं आहे.