खूप उष्णता असूनही ज्वालामुखीच्या आत राहतो 'हा' जीव, जाणून घ्या कसा जगतो तो! By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 04:37 PM 2024-09-23T16:37:14+5:30 2024-09-23T17:10:18+5:30
Interesting Facts : आज आम्ही तुम्हाला हेच सांगणार आहोत की, ज्वालामुखीजवळ कोणते जीव राहतात आणि त्यांचं जीवन कसं असतं. Interesting Facts : ज्वालामुखीचा जेव्हा उद्रेक होतो तेव्हा आजूबाजूच्या शेकडो किलोमीटर परिसरातील लोक याने प्रभावित होतात. ज्वालामुखीच्या आजूबाजूला प्राणी किंवा इतर जीव राहणंही अशक्य असतं.
पण काही जीव आणि प्राणी असे असतात जे ज्वालामुखीजवळ राहतात. आज आम्ही तुम्हाला हेच सांगणार आहोत की, ज्वालामुखीजवळ कोणते जीव राहतात आणि त्यांचं जीवन कसं असतं.
काही अभ्यासकांनी दावा केला आहे की, जेव्हा जगातील सगळ्यात शक्तीशाली ज्वालामुखींचा उद्रेक होतो तेव्हा पृथ्वीचं तापमान वाढण्याऐवजी कमी होतं. ज्वालामुखीमुळे होणाऱ्या स्फोटाने पृथ्वीच्या इतिहासात झालेला कूलिंग पीरिअड समजून घेण्यास मदत मिळते.
ज्वालामुखीच्या आजूबाजूला बरेच जीव राहतात. पण इथे ते जीव दिसत नाहीत जे सामान्यपणे जमिनीवर किंवा पाण्याच्या परिसरात राहतात. इतकंच नाही तर ज्वालामुखीचा स्फोट झाल्यावरही बरेच जीव इथे जिवंत राहतात.
जसे की, तनजारियाच्या ओल डोन्यो लेन्गाई ज्वालामुखीच्या आजूबाजूला साधारण २० लाख लेजर फ्लेमिंगो राहतात. यांचे पंख गुलाबी रंगाचे असतात आणि स्पिरूलिना नावाचे पिगमेंट एल्गी खातात. ज्यामुळे त्यांच्या पंखांचा रंग गुलाबी होतो. ज्या तलावात ते राहतात ते दुसऱ्या जीवांसाठी राहण्यालायक अजिबात नाही. पण लेसर फ्लेमिंगोच्या पायांवरील एक थर त्यांचे पाय भाजण्यापासून बचावतो. ते उकडत्या पाण्यातून मीठ बाजूला करून पाणी पिऊ शकतात.