राष्ट्रीय पक्षी, प्राणी, फूल तुम्हाला माहीत असेलच, पण भारताची राष्ट्रीय भाजी कोणती आहे? By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 02:05 PM 2024-05-29T14:05:37+5:30 2024-05-29T14:36:29+5:30
Indian National Vegetable : भारताचा राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय प्राणी, राष्ट्रीय ध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्रीय फळ अशा अनेक गोष्टी तुम्हाला माहीत असतील. पण तुम्हाला भारताची राष्ट्रीय भाजी कोणती हे माहीत आहे का? Indian National Vegetable : जगभरात वेगवेगळी फळं आणि वेगवेगळ्या भाज्या आहेत. फळं-भाज्यांचे इतके प्रकार आहेत ज्यातील आपल्याला मोजकेच माहीत असतात. ही फळं आणि भाज्या आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्वाचा भाग असतात.
फळं-भाज्यांमधून शरीराला अनेक पोषक तत्वे मिळतात. त्यामुळे रोज फ्रेश आणि वेगवेगळी फळं-भाज्या खाण्यावर लोकांचा भर असतो. डॉक्टर सुद्धा नियमितपणे भाज्या आणि फळं खाण्याचा सल्ला देतात.
आता महत्वाचा मुद्दा असा की, भारताच्या विशेषत गोष्टींबाबत तुम्हाला चांगलंच माहीत असेल. शाळेपासून या गोष्टी शिकवल्या जातात आणि सोशल मीडियावर अशा गोष्टी शेअर होत असतात.
भारताचा राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय प्राणी, राष्ट्रीय ध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्रीय फळ अशा अनेक गोष्टी तुम्हाला माहीत असतील. पण तुम्हाला भारताची राष्ट्रीय भाजी कोणती हे माहीत आहे का? क्वचितच कुणाला याचं उत्तर माहीत असेल. कारण भाजीकडे फारसं कुणी लक्ष देत नाहीत. पण आज आम्ही तुम्हाला यांचं उत्तर सांगणार आहोत.
वेगवेगळी फळं आणि वेगवेगळ्या भाज्या आपण रोजच खात असतो. पण त्यांच्याबाबत आपल्याला फार कमी माहिती असते. आपण त्यांबाबत फार काही जाणून घेण्याच्या मागे लागत नाही. तेच राष्ट्रीय भाजीबाबत होतं. जर तुम्हाला राष्ट्रीय भाजीबाबत विचारलं तर अनेक लोकांना डोकं खाजवावं लागेल.
सामान्यपणे जास्तकरून लोक असाच अंदाज लावतील की, बटाटे किंवा वागी हे भारताची राष्ट्रीय भाजी असतील. तुम्हीही असाच विचार करत असाल तर तुम्ही चुकताय. कारण या दोन्हीपैकी एकही भारताची राष्ट्रीय भाजी नाही. बसला ना धक्का.
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, भोपळा आपल्या देशाची राष्ट्रीय भाजी आहे. बरेच लोक आवडीने भोपळ्याची भाजी खातात आणि भोपळ्याचा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापर करतात. भोपळ्याच्या भाजीला आयुर्वेदात यांना फार महत्व देण्यात आलं आहे. भोपळ्याच्या भाजीने कोलेस्ट्रॉल, डायबिटीय आणि हार्टसंबंधी आजारांमध्ये फायदा मिळतो.
जगभरात भोपळा एकमेव असं फळं आहे ज्याला भाजीच्याही कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आलं आणि फळाच्याही कॅटेगरीत. भारतीय भोपळा आणि परदेशातील भोपळ्यात फरक असतो. भारताशिवाय याचं उत्पादन अमेरिका, मेक्सिको आणि चीनमध्ये सगळ्यात जास्त घेतलं जातं.