Whittier City Where Everyone Lives In 14 Floor Tower Located At Passage Canal In Alaska Us
पोलीस स्टेशन, चर्च, पोस्ट ऑफिस अन्...; १४ मजली इमारतीत संपूर्ण शहर, जग हैराण By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 06:42 PM2022-10-31T18:42:49+5:302022-10-31T19:05:57+5:30Join usJoin usNext जगात अनेक अजब गजब गोष्टी असतात आणि माणसाला रोज काहीतरी नवीन करायचं असतं. मानवी कल्पनेतून नवनवीन गोष्टी सतत आकार घेत असतात. पृथ्वीवरील अशीच एक मानवी संकल्पनेने साकारलेलं शहर अमेरिकेतील अलास्का राज्यात आहे. याठिकाणी एक रहस्यमय शहर केवळ १४ मजली इमारतीत वसलं आहे. चर्च, पोस्ट ऑफिस आणि पोलीस स्टेशन हे सर्व या छोट्या इमारतीत आहे. या शहरात २७२ लोक राहतात. या दुर्गम शहराचे नाव व्हिटियर आहे, जे पॅसेज कालव्याजवळ अलास्कामध्ये वसलेले आहे. बेगीच टॉवर असं या इमारतीचे नाव आहे. शहरात शाळा, चर्च, बाजार, दवाखाना या सर्व सुविधा या इमारतीत आहेत. थेट रस्ता नसल्याने वर्टिकल टाउनपर्यंत रस्त्याने पोहोचणे सोपे नाही. डोंगरावरील बोगदे आणि अवघड रस्त्यांवरूनच इथे पोहोचता येते. याशिवाय येथे जाण्यासाठी सागरी मार्गाचा वापर करता येतो. शीतयुद्धाच्या काळात ही इमारत लष्कराची बॅरेक होती, पण नंतर येथे सामान्य लोक राहू लागले. या इमारतीत राहणाऱ्या लोकांची जीवनशैलीही इतर ठिकाणच्या लोकांपेक्षा वेगळी आहे. या भागातील हवामान बहुतेक वेळा खराब राहते, त्यामुळे येथील लोकांना कुठेही जाणे अशक्य आहे. डेव्ह आणि अण्णा म्हणाले की, जर मी एक शब्द बोलू शकलो तर ते जादुई ठरेल. 'मला वाटते की येथे आम्हाला चांगले लोक बनवलं आहे. कारण तुम्ही कोठून आलात, तुमच्याकडे किती पैसे आहेत याने काही फरक पडत नाही असं अण्णा म्हणाल्या. आम्ही सर्व या शहरात राहतो आणि याला कार्यक्षम बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. शहरात एक शाळा देखील आहे, जी टॉवरच्या अगदी मागे आहे आणि भूमिगत बोगद्याने जोडलेली आहे. येथे राहणारे लोक अपार्टमेंटमध्ये राहत असल्याचं स्वत:ला समजत नाही. माझ्यासाठी हे आश्चर्यकारक नाही असं शहरातील शिक्षिका एरिका यांनी सांगितले. तर अन्य एक व्यक्ती म्हणाला, मी इतरांना सांगू इच्छितो की, आमचे शहर खूप खास, सुंदर ठिकाण आहे. आमच्या शहराबद्दल मत तयार करण्यापूर्वी येथे एकदा पाहा. स्थानिक लोक म्हणतात की, इथले लोक खूप छान आहेत आणि तुम्हाला वाईट वाटू देत नाहीत. तुमच्याशी बोलण्यासाठी तुमच्याकडे नेहमी कोणी ना कोणी असेल. हे शहर दुसऱ्या महायुद्धात अमेरिकन सैन्याने वसवले होते. ते लष्करी केंद्र म्हणून वापरले जात होते.