२२४०० कोटी रूपयांचा मालक आहे हा राजकुमार, राहतो ३४७ खोल्यांच्या आलिशान महालात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 12:03 IST2025-01-22T11:35:21+5:302025-01-22T12:03:41+5:30
आजही येथील राजाचा परिवार राजेशाही थाटात राहतो. हा महाल प्रजेची भूक भागवण्यासाठी उभा करण्यात आला होतो. आज जगभरात डेस्टिनेशन वेडिंगसाठी प्रसिद्ध आहे.

Umaid Bhawan Palace: जेव्हाही राजघराणे, राजे-महाराजे यांचा उल्लेख येतो तेव्हा राजस्थानच्या जोधपूर शहरातील उमेद भवन पॅलेसचा उल्लेख होतोच. साधारण ९६ वर्षाआधी बनलेल्या या महालाची ओळख आज डेस्टिनेशन वेडिंग प्लेस अशी असली तरी याचा इतिहास खूप खास आहे. आजही येथील राजाचा परिवारा राजेशाही थाटात राहतो. हा महाल प्रजेची भूक भागवण्यासाठी उभा करण्यात आला होतो. आज जगभरात डेस्टिनेशन वेडिंगसाठी प्रसिद्ध आहे.
२६ एकर इतक्या परिसरात असलेलं हे भवन बांधण्यासाठी १५ वर्ष लागली होती. सूर्यनगरीतील उम्मेद भवन पॅलेस जगातील सगळ्यात मोठं रेसिडेंशिअल पॅलेस आहे. इतकंच नाही तर हा देशात शेवटचा राजेशाही महाल म्हणूनही ओळखला जातो.
१९२९ मध्ये जोधपूरचे महाराजा उम्मेद सिंह यांनी आपल्या लोकांच्या मदतीसाठी हा महाल बांधला होता. जो बांधण्यासाठी १५ वर्ष लागले आणि १९४३ मध्ये महालाचं निर्माण पूर्ण झालं.
जोधपूरमध्ये दुष्काळ नवीन बाब नाही. त्यावर्षी भीषण दुष्काळ पडला होता. पिकांचं नुकसान झालं होतं. अशात लोकांना उपासमारीपासून वाचवण्यासाठी महाराजानी महाला निर्माण काम सुरू केलं, जेणेकरून लोकांना रोजगार मिळावा. ३ हजार ते ४ हजारांपेक्षा अधिक लोकांनी दिवसरात्र मेहनत करून हा महाल बांधला होता.
या महालाचा नकाशा इंग्लंडच्या लेंकास्टर कंपनीनं तयार केला होता. महालाच्या आत सजावट आणि चित्रकारीसाठी पोलंडमधील प्रसिद्ध चित्रकार जोधपूरला आले होते. तर या उन्मेद भवनाचं डिजाइन वॉन लानचेस्टर यानी तयार केलं होतं.
महाल बनवण्यासाठी बलुआ दगड आणि संगमरवराचा वापर करण्यात आला. महालात एकूण ३४७ खोल्या आहेत. अनेक दरबार हॉल, स्वीमिंग पूल, ग्रंथालय, बिलिअर्ड रूम, भव्य डायनिंग हॉल, गोल्फ कोर्स, गार्डनसहीत अनेक लक्झरी सुविधा आहेत. हा महाल बनवण्यासाठी १,०९,११,२२८ रूपये खर्च आला होता.
उमेद भवनाच्या उद्घाटनाला महाराज उमेद सिंहचे पुत्र आणि महाराज गजसिंह यांचे वडील हनवंत सिंह यांनी सोन्याचं कुलूप उघडून महालाचे दरवाजे उघडले होते.
आज महाल तीन भागात विभागला आहे. ज्यात पहिला रॉयल निवास, दुसरा उमेद भवन पॅलेस म्युझिअम आणि तिसरा उमेद भवन पॅलेस हॉटेल आहे.
१९७१ मध्ये हा महाल तीन भागांमध्ये विभागण्यात आला होता. टाटाच्या हॉटेल ताजने युवराज शिवराज सिंह यांच्यासोबत पार्टनरशिप केली आणि ७० पेक्षा अधिक रूममध्ये आलिशान हॉटेल सुरू केलं. हे एक फेमस डेस्टिनेशन वेडिंग प्लेस आहे. इथे प्रियांका चोप्रा, पीवी सिंधु यांची लग्न झाली.
उमेद भवनचे मालक आणि जोधपूर राजपरिवाराचे युवराज आणि स्टार पोलो खेळाडू शिवराज सिंह हे येथील सगळा कारभार बघतात. युवराज सिंह आता या महालाचे उत्तराधिकारी आहेत. २६ एकरात असलेल्या या महालातून राजघराण्याची मोठी कमाई होते.
स्टार्टअप टॉकीनुसार गज सिंह यांच्या परिवाराची एकूण संपत्ती २२४०० कोटी रूपये आहे. त्यांचे वारस युवराज शिवराज सिंह ही संपत्ती वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. ते इथे होणाऱ्या इव्हेंट्सही देखरेख करतात. उमेद भवन सोबतच ते बाल समंद आणि सरदार समंद सारख्या हॉटेलचे मालक आहेत.
युवराज शिवराज सिंह पोलो खेळाडू आहेत. त्यानी बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमधून डिग्री मिळवली आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यानी काही दिवस नोकरीही केली. पण नंतर ते परदेशातून परिवाराची जबाबदारी घेण्यासाठी परतले.