कधी आणि कसा झाला आरशाचा आविष्कार? तुम्हालाही माहीत नसेल उत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 04:01 PM2024-08-17T16:01:29+5:302024-08-17T16:56:18+5:30

Mirror History : तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की, आरशाचा आविष्कार कुणी केला आणि कसा केला? अनेकांना या प्रश्नाचं उत्तर माहीत नसेल.

Mirror History: आरसा हा मनुष्यांच्या जीवनातील एक महत्वाचा भाग आहे. आरशात चेहरा बघूनच अनेकांच्या दिवसाची सुरूवात होते. जवळपास सगळेच लोक आरसा बघतात. पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की, आरशाचा आविष्कार कुणी केला आणि कसा केला? अनेकांना या प्रश्नाचं उत्तर माहीत नसेल. मात्र, आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सांगणार आहोत.

आरसा आज आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग असला तरी आरशाचा इतिहास फार जुना आणि तेवढाच रोमांचकही आहे. जेव्हा आरसा नव्हता तेव्हा लोक पाण्यात आपला चेहरा बघत होते. तलाव, नदी किंवा भांड्यातील पाण्यात ते आपला चेहरा बघत होते.

कालांतराने लोक चमकदार दगडांमध्ये आपला चेहरा बघत होते. नंतर पुढे चेहरा बघण्यासाठी धातुंचा वापर होत होता. चेहरा बघण्यासाठी तांबे आणि कांस्याचा वापर केला जात होता.

अशात प्रश्न असा पडतो की, मग आरशाचा आविष्कार कधी झाला? तर आरशाचा शोध तेव्हा लागला जेव्हा लोक वाळू आणि काही खास खनिज एकत्र करून गरम करू लागले. या प्रक्रियेदरम्यान एक पारदर्शी पदार्थ बनला. ज्याला आपण आता आरसा म्हणतो.

असं मानलं जातं की, प्राचीन इजिप्तमधील लोक सगळ्यात आधी आरसा बनवण्यात यशस्वी ठरले होते. त्यांनी त्या पारदर्शी पदार्थाचा वापर आरशाचा वापर दागिने आणि आरसे बनवण्यासाठी केला होता.

रोमन सभ्यतेमध्ये आरशांचा वापर आणखी वाढला. रोमन लोकांनी याची निर्मिती खूप वाढवली. त्यानंतर यांचा वापर खिडक्या, आरसे आणि सजावटीच्या वस्तूंसाठी केला गेला.

आता अजून प्रश्न शिल्लक राहतो की, आरशात सगळ्यात आधी कुणी आपला चेहरा पाहिला होता? याचं खरं उत्तर तर कुणाकडेच नाही. पण काही लोकांचा असा दावा आहे की, तेबिली नावाच्या व्यक्तीने सगळ्यात आधी आरशात चेहरा पाहिला होता.

आता अजून एक प्रश्न शिल्लक राहतो की, आरशात सगळ्यात आधी कुणी आपला चेहरा पाहिला होता? याचं खरं उत्तर तर कुणाकडेच नाही. पण काही लोकांचा असा दावा आहे की, तेबिली नावाच्या व्यक्तीने सगळ्यात आधी आरशात चेहरा पाहिला होता.