अखेर विमानात जास्त महिलांचाच स्टाफ का असतो? फारच इंटरेस्टींग आहे यामागचं कारण.... By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 04:22 PM 2021-06-03T16:22:36+5:30 2021-06-03T16:29:47+5:30
तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल की, विमानात प्रवाशांच्या मदतीसाठी जास्त महिला स्टाफच असतो. प्रवाशांच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी एअर होस्टेस असतात. तुम्ही कधी विमानाने प्रवास केलाय का? नसेल केला तर विमानात कुणाला ना कुणाला प्रवास करताना सिनेमात किंवा सीरीजमध्ये पाहिलं असेलच. तेव्हा एक तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल की, विमानात प्रवाशांच्या मदतीसाठी जास्त महिला स्टाफच असतो. प्रवाशांच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी एअर होस्टेस असतात.
जगभरातील अनेक फ्लाइट कंपन्या फ्लाइट अटेंडंट म्हणून पुरूषांच्या तुलनेत महिलांनाच जास्त प्राधान्य देतात. इतकंच नाही तर विमानाच्या आत काम करणाऱ्या क्रू मेंबर्समध्येही सर्वात जास्त महिलाच असतात. काही रिपोर्टनुसार, मेल आणि फीमेल कॅबिन क्रू मेंबरचं प्रमाणा जवळपास २/२० असतं. तेच काही परदेशी एअरलाइन्समध्ये हे प्रमाण ४/१० असतं.
या आकडेवारीवरून हे स्पष्ट होतं की, फ्लाइट स्टाफमध्ये महिलांची भागीदारी सर्वात जास्त असते. पण प्रश्न उभा राहतो की, अखेर असं का? महिलांना पुरूषांच्या तुलनेत फ्लाइट स्टाफमध्ये जास्त महत्व का दिलं जातं?
तुमच्यापैकी अनेकांना हे वाटत असेल की, महिलांच्या सुंदरता याचं कारण आहे. पण खरं कारण हे नाही. याचं खरं कारण काही वेगळंच आहे. चला जाणून घेऊ काय आहे यामागचं खरं कारण...
हे एक फारच मोठं सायकॉलॉजिकल फॅक्ट आहे की, अनेक लोक पुरूषांच्या तुलनेत महिलांचं म्हणणं जास्त लक्ष देऊन ऐकतात आणि केवळ ऐकतंच नाही तर त्यांचं बोलणं फॉलोही करतात.
फ्लाइटमध्ये सेफ्टी गाइडलाईन्स आणि आवश्यक दिशा निर्देशांचं पालन करणं गरजेचं असतं. त्यामुळे फ्लाइटमध्ये जास्तीत जास्त एअरहोस्टेस या गोष्टींच्या घोषणा करतात.
फ्लाइट स्टाफमध्येही महिला जास्त निवडण्यामागचंही एक मोठं कारण आहे. ते म्हणजे त्यांच चरित्र पुरूषांच्या अपेक्षेत जास्त कोमल, उदार आणि विनम्र असतं. याच उदार चरित्रामुळे प्रवाशांच्या मनात फ्लाइट कंपनीबाबत एक सकारात्मक इमेज तयार होते.
एका विमानात जेवढं कमी वजन असेल तेवढं त्याचं इंधन आणि पैसा वाचतो. याच तुलनेत महिलांचं वजन पुरूषांच्या तुलनेत कमी असतं आणि कमी वजन विमान कंपनीसाठी एक फायद्याची गोष्ट आहे. त्यामुळे फ्लाइटमध्ये नेहमीच कमी वजनाच्या स्लिम महिला जास्त बघायला मिळतात. हेच यामागचं कारण असल्याचं सांगितलं जातं.
एक अशी मान्यता आहे की, पुरूषांच्या तुलनेत महिला व्यवस्थापन सांभाळण्यात अधिक सक्षम असतात. त्या कोणतीही गोष्ट काळजीपूर्वक ऐकतात आणि ती फॉलो करतात.
याच कारणांमुळे फ्लाइट क्रूमध्ये पुरूषांच्या तुलनेत महिलांचा जास्त समावेश असतो. तुम्हाला हेही माहीत असायला हवं की, जास्तीत जास्त विमान कंपन्या पुरूषांना फ्लाइट अटेंडंट म्हणून अशा स्थितीत निवडतात जेव्हा जास्त बल आणि मेहनतीचं काम असतं.