Why are printed in a newspaper all four symbols, know ...
वृत्तपत्रामध्ये का छापली जातात चार रंगांमधील सांकेतिक चिन्हं, जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 04:23 PM2019-10-02T16:23:41+5:302019-10-02T16:29:57+5:30Join usJoin usNext बऱ्याचदा सकाळी उठल्या उठल्या वृत्तपत्र वाचनाची अनेकांना आवड असते. वृत्तपत्रातून माहितीपूर्ण लेखांसह अनेक महत्त्वाच्या बातम्या वाचल्या जातात. पण आपल्याला माहीत आहे का, वृत्तपत्रामध्ये चार रंगांमधील सांकेतिक चिन्हं का छापली जातात. लाल, पिवळा आणि निळा हे तीन मुख्य रंग आहेत. त्याच्यात आणखी एक काळा रंग जोडलेला असतो. वृत्तपत्रात छापून आलेलं CMYKचा क्रम असतं. Cचा अर्थ असतो Cyan, प्रिंटिंगमध्ये Cyanचा अर्थ निळा असतो, M म्हणजे Magenta गुलाबी असतो. Yचा अर्थ Yellow पिवळा रंग असून, Kम्हणजे काळा रंग असतो. वृत्तपत्र छापताना या रंगांचा मोठा आधार असतो. सर्वच पानं एका पृष्ठभागावर व्यवस्थित ठेवली जातात. ही चिन्हे असल्यानं मशिन क्रमाप्रमाणे पानं छापण्याची काम करते. तसेच या चिन्हांमुळे छापखान्यातील कर्मचाऱ्यांना मदत होते. जर पानांवर ही चिन्हे नसल्यास वेगवेगळ्या रंगांची पानं एकावर एक छापून येण्याची शक्यता असते. वेगवेगळ्या रंगांच्या प्लेट्स एकत्र आल्यानंतर एकमेकांना छापून येण्यात सहकार्य करतात. जर प्लेस नियोजित ठिकाणी न ठेवल्यास छापताना पानांच्या क्रमामध्ये गोंधळ उडू शकतो.