जगभरातील स्कूल बसचा रंग पिवळाच का असतो? ही कारणं तुम्हाला माहीत नसतील....

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 04:45 PM2021-11-23T16:45:53+5:302021-11-23T16:51:51+5:30

School Bus Colour : एक गोष्ट लक्षात घ्या की, स्कूल बसला रंग कोणता असावा ही काही फक्त आवडीची बाब नाही. तर असं असण्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे.

तुम्ही स्कूल बस तर अनेकदा पाहिली असेल. कदाचित तुम्ही त्यात प्रवासही केला असेल. तुमच्या लक्षात आलं असेल की, स्कूल बस कोणतीही असो, पण त्यांचा रंग मात्र नेहमी पिवळाच असतो. अशात कुणालाही हा प्रश्न पडू शकतो की, सर्व स्कूल बसचा रंग पिवळाच का असतो? स्कूल बसचा रंग लाल, निळा किंवा अजून दुसरा का नसतो? चला तर मग जाणून घेऊ या प्रश्नाचं उत्तर.

एक गोष्ट लक्षात घ्या की, स्कूल बसला रंग कोणता असावा ही काही फक्त आवडीची बाब नाही. तर असं असण्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. प्रत्येक रंगाची आपली एक वेवलेंथ आणि फ्रीक्वेन्सी असते. म्हणजे लाल रंगाचा वापर आपण ट्रॅफिक सिग्नलचा स्टॉप लाइट म्हणून करतो. याचं कारण त्याची वेवलेंथ ही कोणत्याही हिरव्या रंगापेक्षा जास्त असते.

एका लाल रंगाची वेवलेंथ साधारण ६५० एनएम असते. सोबतच लाल रंग पसरत नाही. अशात हा लाल रंगाचा लाइट दिवसाच्या प्रकाशातही दूरून स्पष्टपणे दिसतो. हेच कारण आहे की, याचा वापर धोका दर्शवण्यासाठीही केला जातो. याचप्रकारे स्कूल बससाठी पिवळा रंग वापरण्यामागे त्याची वेवलेंथ हेच मुख्य कारण आहे

रंगांचा VIBGYOR सात रंगांचा एक संच असतो. जांभळा, आकाशी, निळा, हिरवा, पिवळा, केशरी आणि लाल यांचा यात समावेश असतो. यात वेवलेंथच्या बाबतीत पिवळा रंग लाल रंगाच्या खाली येतो. म्हणजे पिवळ्या रंगाची वेवलेंथ लाल रंगापेक्षा कमी असते. मात्र, निळ्या रंगापेक्षा जास्त असते.

आता लाल रंगाचा आधीच धोका दाखवण्यासाठी वापर झाला होता. अशात पिवळा रंगच सर्वात चांगला होता, जो स्कूल बससाठी वापरला जाऊ शकत होता. त्याशिवाय पिवळ्या रंगाची आणखी एक खासियत म्हणजे. पिवळा रंग पाऊस, धुकं आणि अंधारात स्पष्टपणे दिसतो. कारण याचं लॅटरल पेरीफेरल व्हिजन लाल रंगाच्या तुलनेत १.२४ पटीने जास्त असते.

लॅटरल पेरीफेरल व्हिजनचा अर्थ आहे की, ज्याला कोपऱ्यात किंवा आजूबाजूलाही सहजपणे बघता येतं. म्हणजे जर कुणी सरळ बघत नसेल तरी त्याला पिवळ्या रंगाची बस समोर येताना दिसेल. अशात स्कूल बसचा रंग पिवळा असल्याने हायवेवर दुर्घटनांची शक्यता कमी आहे.

भारतात सुप्रीम कोर्टाने स्कूल बससाठी अनेक प्रकारचे निर्देश तयार केले आहेत. ज्यात पिवळ्या रंगाचाही समावेश आहे. जर स्कूल कॅब असेल तर पिवळ्या रंगासोबत १५० एमएमची एक हिरवी पट्टीही असायला हवी. हिरवी पट्टी कॅबच्या चारही बाजूने असावी. पट्टीवर स्कूल कॅब लिहिणं गरजेचं आहे.

Read in English