रिटायरमेंटनंतर आर्मीतील श्वानांना ठार का मारलं जातं? जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 12:01 PM2020-03-11T12:01:28+5:302020-03-11T12:26:27+5:30

रिटायरमेंटनंतर मारले का जातात? - सेनेतील श्वानांना रिटायरमेंटनंतर मारण्याची प्रथा आहे. ही प्रथा इंग्रजांच्या काळापासून चालत आली आहे.

आर्मीतील श्वान आपल्या देशांची सेवा एखाद्या सैनिकाप्रमाणे करतात. कितीतरी हल्ले या श्वानांच्या मदतीने हाणून पाडण्यात आले आणि कितीतरी गुन्हेगारांना त्यांनी पकडून दिलंय. पण हे वाचून तुम्हाला धक्का बसेल की, या श्वानांना तोपर्यंत जिवंत ठेवलं जातं जोपर्यंत ते सैन्यात काम करतात. ते रिटायर झाल्यावर त्यांना मारलं जातं. याविरोधात अनेक एनजीओंनी प्रश्नही उपस्थित केले आहेत.

ब्रिटनमध्ये २००९ ते १३ दरम्यान ३१८ श्वानांना दत्तक देण्यात आलं तर २८८ श्वानांना आरोग्य खराब असल्याने मारण्यात आलं. भारतातील अनेक राज्यांमध्ये पोलिसांच्या श्वानांना त्यांच्या ट्रेनर्सना दत्तक दिलं जातं. कर्नाटक, पश्चिम बंगालमध्ये अशी दत्तक देण्याची सुविधा आहे. या श्वानांना नंबर आणि नावाने ओळखले जाते.

या श्वानांची बुद्धी क्षमता त्यांच्या प्रजातीवर अवलंबून असते. त्यानुसारच हे श्वान वेगवेगळ्या कामांमध्ये तरबेज असतात. त्यांच्या योग्यतेनुसारच त्यांची ड्युटी लावली जाते.

रिटायरमेंटनंतर मारले का जातात? - सेनेतील श्वानांना रिटायरमेंटनंतर मारण्याची प्रथा होती. ही प्रथा इंग्रजांच्या काळापासून चालत आली आहे.

जर एखादा कुत्रा एक महिन्यापेक्षा अधिक आजारी राहत असेल किंवा ट्युटी व्यवस्थित करू शकत नसेल तर त्याला विष(अॅनिमल यूथेनेशिया) देऊन किंवा बंदुकीच्या गोळीने ठार केलं जातं. त्याआधी मोठ्या सन्मानाने त्यांना रिटायर केलं जातं. पण या श्वानांना मारण्यामागे दोन तर्क सांगितले जातात.

१) त्यांना सेनेच्या सर्व लोकेशन संपूर्ण माहिती असते. सोबतच इतर गोपनीय माहितीही त्यांना असते. अशात जर त्यांना एखाद्या सामान्य व्यक्तीकडे सोपवलं तर हे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकतं.

२) जर या श्वानांना एनिमन वेलफेअर सोसायटी किंवा कोणत्या खाजगी हातांमध्ये दिलं तर ते त्या श्वानांना तशा सुविधा देऊ शकत नाहीत जशा त्यांना सेनेत मिळतात.

सेनेतील श्वानांना विशेष सुविधा दिल्या जाता. श्वानांसोबतच हॅंडलर्सचं ट्रेनिंगही होतं. श्वानांचं ट्रेनिंग ते ६ ते ९ महिन्यांचे असतात तेव्हापासून सुरू होते.

सर्वच श्वानांना ट्रेकर ट्रेनिंग, एक्सप्लोसिव्स डिटेक्शन, सर्च अॅन्ड रेस्क्यू इत्यादी कोर्स शिकवले जातात. ट्रेनिंगदरम्यान हॅंडलरला सुट्टी दिली जात नाही. ट्रेनिंगनंतर श्वान आणि हॅंडलरची परीक्षा घेतली जाते. जर रिझल्ट योग्य आला नाही तर त्यांच्या ट्रेनिंग कालावधी वाढवला जातो.

आर्मी किंवा इतर संस्था श्वानांना नॅशनल ट्रेनिंग सेंटर फॉर डॉग्स, टेकनपूर, मेरठ येथील रिमाउंट वेटरनरी कॉर्प्स, नॅशनल ट्रेनिंग सेंटर फॉर डॉग्स अॅन्ड एनिमल्स, चंडीगढ येथून घेतात. इथे श्वानांना ट्रेनिंग दिलं जातं. ट्रेनिंगसाठी भरती होण्याआधी या श्वानांची किंमत २० ते ३५ हजार रूपये असते. पण तयार झाल्यावर त्यांची किंमत २ ते ३ लाख रूपये होते.

श्वानांच्या प्रशिक्षणासाठी त्यांच्या हॅडलर्सना आणि श्वानांना वेगवेगळे सन्मान दिले जातात. तसेच त्यांना त्यांच्या सेवेसाठी आणखी वेगळे सन्मान दिले जातात.

या श्वानांमध्ये लेब्राडोर, जर्मन शेफर्ड, डाबरमॅन, कोकर स्पाइनल आणि बेल्जिअम शेफर्ड प्रजातीच्या श्वानांना प्राधान्य दिलं जातं.

श्वानांना मारण्याची ही प्रथा बंद करण्याची विनंती काही संस्थांनी केली होती. यावर सरकारने देखील पॉलिसी करणार असल्याचं सांगितलं होतं. पण याचं पुढे काय झालं त्याबाबत माहिती मिळू शकली नाही.