पत्त्यांच्या खेळात चार राजे असतात, पण प्रत्येक राजाला मिशा आणि बदामच्या राजाला का नाही? जाणून घ्या कारण By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 01:47 PM 2022-01-06T13:47:48+5:30 2022-01-06T13:57:28+5:30
why king of hearts doesn't have moustache : जर तुमच्यापैकी कुणाचा यावर लक्ष गेलं असेल तर प्रश्न पडला का की, असं का केलं असेल? जर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर जाणून घ्या. आपल्या देशात जेव्हा लोकांकडे रिकामा वेळ असतो तेव्हा ते पत्ते खेळून टाइमपास करतात. मनोरंजनापासून ते जुगारापर्यंत पत्त्यांची महत्वाची भूमिका असते. जग आता आधुनिक झालं आहे, त्यामुळे लोक समोरासमोर बसून खेळला जाणारा हा खेळ आता मोबाइलवर खेळतात. पण पत्ते खेळण्याची क्रेझ आजही कायम आहे. भारतातील अनेक भागात आजही पत्ते खेळताना लोकांना पाहिलं जातं.
या पत्त्यांच्या खेळात यातील चार रंगांच्या चार बादशाहांचं फारच वजन असतं. तुमच्यापैकीही अनेकांनी कधीना कधी पत्ते खेळले असतील. पण तुमचं कधी यावर लक्ष गेलंय का की, चार रंगांच्या राजांमध्ये तीनच राजांना मिशा असतात आणि एकाला नसतात. जर तुमच्यापैकी कुणाचा यावर लक्ष गेलं असेल तर प्रश्न पडला का की, असं का केलं असेल? जर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर जाणून घ्या.
हे पत्ते पूर्ण ५२ असतात चार रंगाच चार राजा असतात. पण यातील एका राजाला मिशाच नसतात. मिशा नसलेला हा राजा असतो लाल पानाचा म्हणजे बदामचा राजा. ज्याला किंग ऑफ हार्ट असंही म्हणतात.
याबाबत असं सांगितलं जातं की, जेव्हा पत्त्यांचा खेळ अस्तित्वात आला तेव्हा बदामच्या राजाला मिशा असायच्या. पण जेव्हा हे पत्ते पुन्हा डिझाइन करण्यात आले तेव्हा डिझायनर या बदामच्या राजाला मिशा काढणं विसरला. आश्चर्याची बाब म्हणजे डिझायनरची ही चूक कधी सुधारली गेली नाही आणि आतापर्यंत किंग ऑफ हार्ट मिशा नसलेलाच आहे.
याबाबत अशीही एक मान्यता आहे की, पत्त्याच्या खेळात हे जे ४ राजा आहेत ते सर्वच इतिहासातील काही महान राजांना समर्पित आहेत. असं मानलं जातं की, हुकुमचा राजा हा इस्त्राइलचा पुरातन युगातील राजा आहे. ज्याचं नाव डेविड होतं. त्यानंतर चिडीच्या राज्याबाबत सांगितलं जातं की, हे पान मेसाडोनियाचा जग जिंकणारा राजा सिकंदरला समर्पित आहे.
लाल पान किंवा किंग ऑफ हार्टचं पान हे फ्रान्सचा राजा शारलेमेनच्या चित्रावर आधारित असल्याचं सांगितलं जातं. तो रोमन साम्राज्याचा पहिला राजा होता. तर डायमंड किंगचं पान हे रोमन राजा सीझर ऑगस्टसचं मानलं जातं. काही याला ज्यूलिअस सीझरचा फोटो मानतात.
हे नाव त्याला देण्यात आलं कारण त्याच्या डोक्याच्या मागे तलवार दिसते. या तलवारीला डोक्यामागून हल्ला करणाऱ्या शस्त्राच्या रूपात पाहिलं जातं. पण नंतर हे डिझाइन बदललं गेलं आणि या फोटोत कुऱ्हाड दिसू लागली होती.
त्यानंतर १६व्या शतकाच्या शेवटी काही फ्रेंच कार्ड मेकर्सनी पत्ते डिझाइन केले. यात सर्व रंगाच्या राजांसाठी नवे डिझाइन केले गेले. हा तोच काळ होता जेव्हा पत्त्यांमधील राजांना जगातील महान राजांना जोडून बघितलं जात होतं.
काही असेही दावे केले जातात की, पत्त्यांचं डिझाइन १८व्या शतकाच्या शेवटपर्यंत सुरू होतं. त्यासोबतच असाही दावा केला जातो की, पत्ते बुद्धीबळासारखे शाही भूतकाळाशी जुळलेले आहेत. पण यातील राजा कोणत्याही खास व्यक्तीला दर्शवत नाही.
काही वेबसाइट्सचा असाही दावा आहे की, इंग्लिश किंग कार्ड्सचं कनेक्शन कधी ऐतिहासिक राजांसोबत जोडलं गेलं नाही. ऐतिहासिक राजा आणि पत्त्यांमधील राजांचं संबंध जोडण्याची आयडिया फ्रेन्च लोकांची होती. तेच पत्त्यांमधील बदामचा राजा म्हणजे किंग ऑफ हार्टला अनेक ठिकाणी सुसाइड किंग असंही म्हटलं जातं.
हे नाव त्याला देण्यात आलं कारण त्याच्या डोक्याच्या मागे तलवार दिसते. या तलवारीला डोक्यामागून हल्ला करणाऱ्या शस्त्राच्या रूपात पाहिलं जातं. पण नंतर हे डिझाइन बदललं गेलं आणि या फोटोत कुऱ्हाड दिसू लागली होती.