सापांची जीभ दोन भागात कापलेली का असते? माहीत नसेल तुम्हाला याचं कारण... By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 02:47 PM 2021-06-18T14:47:40+5:30 2021-06-18T14:53:34+5:30
साप आपली जीभ बाहेर काढून हवेत एकडे-तिकडे फिरवतात. पण या जिभेचं काम काय असतं? काय याचा मनुष्यांच्या दोन कानांशी आणि नाकांच्या दोन छिद्रांशी काही संबंध असतो? मनुष्यांसोबतच अनेक प्राण्यांना-जीवांना एक जीभ असते. पण सापाची एक जीभ दोन भागात विभागलेली असते. या प्रश्नाने अनेक वर्ष वैज्ञानिक आणि जैववैज्ञानिकांसाठी मोठी अडचण निर्माण केली होती. साप आपली जीभ बाहेर काढून हवेत एकडे-तिकडे फिरवतात. पण या जिभेचं काम काय असतं? काय याचा मनुष्यांच्या दोन कानांशी आणि नाकांच्या दोन छिद्रांशी काही संबंध असतो? चला तर जाणून घेऊ यामागचं कारण....
यूनिव्हर्सिटी ऑफ कनेक्टीकटमध्ये इकोलॉजी आणि इव्हॉल्यूशनरी बायोलॉजीचे प्राध्यापक कर्ट श्वेंक म्हणाले की, सापांची जीभ दोन भागात विभागण्याची कहाणी डायनॉसॉरच्या काळापासून सुरू होते. ही बाब आहे साधारण १८ कोटी वर्षाआधीची. आपल्या भव्य आणि भयावह नातेवाईकांच्य पायाखाली येऊ नये म्हणून साप मातीतील खड्ड्यांमध्ये किंवा बिळात लपून रहायचे. सापांच शरीर लांब, बारीक आणि सिलेंडरसारखं असतं. त्यांना पाय नसतात. प्रकाश नसेल तर त्यांना धुसर दिसतं. सापांची जीभ त्यांच्यासाठी नाकाचं काम करते. ते गंध घेण्यासाठी जीभ हवेत फिरवतात.
फ्रान्सचे वैज्ञानिक बर्नार्ड जर्मेन डे लेसेपेडे यांनी सांगितलं होतं की, अॅरिस्टॉटल यांचं मत होतं की, सापांची दोन भागात विभागलेली जीभ टेस्टचा डबल आनंद घेण्यासाठी असते. १७व्या शतकातील वैज्ञानिक जियोवानी बॅटिस्टा होडिर्ना यांचं मत होतं की, साप आपल्या जिभेने माती उचलतात. कारण त्यांना सतत जमिनीवरून सरपटत जायचं असतं. तर इतर वैज्ञानिकांचं मत होतं की, ते आपल्या जिभेने कीटकांना पकडतात.
एक मजेदार थेअरीही होती की, साप आपल्या जिभेने दंश मारतात. असं मानलं जातं की, ही चुकीची माहिती प्रसिद्ध लेखक शेक्सपिअर यांनी आपल्या कहाण्यांमधून लोकांमध्ये पसरवली होती. त्यांचं मत होतं की, साप आपल्या जिभेने दुश्मनांना मारतात. तेच फ्रान्सचे नॅच्युरलिस्ट जीन बॅपटिस्टे लॅमार्क याचं थोडं योग्य कारण सांगितलं होतं. लॅमार्क सांगत होते की, साप आपल्या जिभेने काही गोष्टींची जाणीन करून घेतात. कारण त्यांना कमी प्रकाशात कमी दिसतं. लॅमार्क यांची ही थेअरी १९व्या शतकापर्यंत सत्य मानली जात होती.
सापांच्या दोन भागात विभागलेल्या जिभेचं खरं काम १९०० नंतर समजलं. सापाच्या जिभेला वोमेरोनेजल असं म्हणतात. हा अवयव अनेक अशा जीवांमध्ये आढळतो जे जमिनीवर सरपटत जातात. केवळ माकडांच्या पूर्वजांमध्ये आणि मनुष्यांमध्ये असं नसतं. वोमेरोनेजल अवयव सापाच्या नाकाच्या चेंबरखाली असतो. साप जिभेच्या दोन्ही भागांना गंध ओखळणारे कण त्यावर चिकटवून हवेत काढतात. या कणांना गंध चिकटतो. यावरून सांपाना कळतं की, आजूबाजूला किंवा समोर काय आहे. किंवा काय होऊ शकतं.
सापांच्या जिभेवर असणारे हे कण गंध ओखळून सापाच्या तोडांत जातात. याने सापाच्या मेंदूला संदेश जातो की, समोर काय आहे किंवा काय होऊ शकतं. समोर धोका आहे की, काही खाण्यासाठी. साप जास्तीत जास्त जीभ बाहेर काढतात. जेणेकरून लाबंपर्यंतच्या एरियाची त्यांना माहिती मिळावी.
जिभेच्या दोन वेगवेगळ्या भागांवरून वेगवेगळे गंध जाणून घेऊ शकतात. साप गंध चिकटवणाऱ्या कणांना जिभेच्या वेगवेगळ्या अवयवांपर्यंत पाठवतात. ही त्याचप्रमाणे काम करते जसे आपले कान. कान वेगवेगळ्या दिशेने येणारे आवाज समजू शकतात. आवाजावरून दिशेचीही माहिती मिळवू शकतो. याचप्रमाणे साप जिभेच्या माध्यमातून धोक्याची माहिती घेतात. जेवणाचा शोध घेतात आणि प्रजननासाठी मादा सापाचा शोध घेतात.
पालींसारखी सापांची जीभ काम करते. अनेकदा तर जिभेचा एक भाग वर तर कधी दुसरा खाली असतो. जीभ गंध आपल्याकडे खेचते. दोनपैकी एकाही जिभेच्या भागावर गंध चिकटला तर याचा संदेश मेंदूपर्यंत पोहोचतो.
जिभेच्या दोन्ही भागाचा सापांना खूप फायदा होतो. त्यांना हे कळतं की, कोणत्या दिशेने जाणं त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल आणि कोणत्या दिशेने धोका असेल. त्यांची ही जीभ त्यांचा जीवही वाचवते आणि त्यांना अन्नही देते. कर्ट म्हणतात की, हे तर स्पष्ट झालं आहे की सापांची जीभ ही टेस्टसाठी नाही तर गंध घेण्यासाठी असते.