गाडीच्या टायरला का असतात काटे? कधी विचार केलाय? ती डिझाईन नसून करतात 'ही' कामं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 06:36 PM2022-08-24T18:36:02+5:302022-08-24T18:45:04+5:30

तुम्ही गाडीच्या टायरला कधी नीट पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की, या टायरवरती काळ्या रंगाचे छोटे काटे असतात. परंतु हे का असतात? त्याचं कार्य काय? असा कधी विचार केलाय?

आपण जर आपल्या आजूबाजूला पाहिलं तर आपल्याल अनेक गाड्या दिसतील आणि गाड्या म्हटलं की, टायर हे आलेच. गाड्यांचे टायर हे नेहमी काळ्या रंगाचे आणि रबराचे असल्याचे तुम्ही पाहिले असेल.

या रबराच्या टायरकडे पाहिल्यावर बऱ्याचदा आपल्याला काटे दिसले असतील, परंतु आपण याकडे मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट म्हणून पाहिले आहे.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल कारण टायरवरील हे काटे मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट नाही तर ही टायरचे डिझाइन आहे.

पण मग प्रश्न असा उपस्थित रहातो की, असं डिझाइन कशासाठी? तर टायरवरील हे रबरी काट्यांना वेंट स्प्यूज म्हणतात.

हे काटे टायर्सची कार्यक्षमता सुधारण्यासाठी बनवले जातात.

सोप्या भाषेत समजून घ्यायचे झालं, तर गाडी चालू असताना टायरवर दबाव निर्माण होतो, तसेच टायरचे रोडवर घर्षण होते, त्यामुळे हा दबाव कमी करण्यासाठी हे काटे तयार केले जातात.

दुसरं कारण म्हणजे टायर बनवताना त्यात बुडबुडे तयार होण्याचा धोका असतो. हे अंतर्गतरित्या घडल्यास, टायर कमकुवत होऊ शकतात, म्हणून त्यांना असे काटे काढल्याने टायर कमकूवत होण्याचा धोका कमी होतो.

तसेच आपल्याला फक्त गोल टायर पाहायला मिळत नाही, त्यावर काही ना काही डिझाइन असते. मग हे डिझाइन का बनवले जाते? टायरमध्ये खाचे का असतात?

तर यामागचं कारण आहे गाडी स्लिप होऊ नये आणि कच्च्या तसेच वर खाली असलेल्या रस्त्यावरुन गाडी चालवणं सोपं होईल.

जर तुम्ही टायर विकत घेताना त्याला असे काटे दिसले किंवा असे जास्त खाच असलेले डिझाइन दिसले, तर समजा की तुमचा टायर दर्जेदार आहे. त्यामुळे पुढच्या वेळी टायर विकत घेताना असा काटे असलेला टायर विकत घ्या, तो तुमच्यासाठी फायद्याचे देखील ठरेल.