wife alleges husband cheated her in ludo both reached police station kkg
CoronaVirus: नवरा लुडो खेळताना चीटिंग करतो; बायकोनं थेट पोलीस स्टेशन गाठलं अन्... By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 04:15 PM2020-04-13T16:15:05+5:302020-04-13T16:22:33+5:30Join usJoin usNext कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात टाळण्यासाठी देशात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. घरीच राहा, सुरक्षित राहा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेकदा केलं आहे. घरात राहून कंटाळा येत असल्यानं वेळ घालण्यासाठी अनेक जण विविध बैठे खेळ खेळत आहेत. बरीचशी तरुण मुलं पबजी खेळत असताना मोठ्यांनी मात्र लुडोला पसंती दिली आहे. उत्तर प्रदेशातलं एक दाम्पत्य लुडो खेळत असताना त्यांच्यात वाद झाला. हा वाद थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला. फर्रुखाबादमध्ये राहणारे पती पत्नी लुडो खेळत होते. पाच महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला आहे. पती शेतकरी असल्यानं सध्या त्याला फारशी कामं नाहीत. त्यामुळे तो वेळ घालवण्यासाठी पत्नीसोबत लुडो खेळत होता. लुडो खेळत असताना दोघांमध्ये वाद झाला. पती फसवणूक करत असल्याचा आरोप पत्नीनं केला. वाद विकोपाला गेल्यानंतर पत्नीनं थेट पोलिसांना फोन केला. पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पती पत्नीला पोलीस ठाण्यात आणलं गेलं. लुडो खेळताना फसवणूक करत असल्याचा आरोप दोघांनी एकमेकांवर पोलिसांसमोर केला. त्यानंतर पोलिसांनी दोघांची समजूत घातली आणि भांडण मिटवलं. त्यानंतर पती पत्नी घरी गेले. मेरापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही विचित्र घटना घडली. ती पाहून पोलीस काही काळ चक्रावून गेले.टॅग्स :कोरोना वायरस बातम्याcorona virus