अंडरविअरमुळे उघड झालं अफेअरचं रहस्य, महिलेला चीट करत होता तिचा पती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 05:04 PM2022-01-04T17:04:51+5:302022-01-04T17:14:59+5:30

Relationship : महिलेचं वय साधारण ३८ वर्षे आहे तर तिच्या पतीचं वय ४२ वर्षे आहे. दोघांच्या लग्नाला आठ वर्ष झालीत. तरीही तिचा पती आपल्या पत्नीला चीट करत आहे.

प्रेमात दगा मिळाल्यावर अर्थातच कुणालाही दु:खं होतं आणि अशात पती जर पत्नीला दगा देत असेल तर महिलेला जास्त दु:खं होतं. अशाच एका महिलेने तिचा अनुभव जगाला सांगितला. महिलेने सांगितलं की, तिच्या पतीचं त्याच्या असिस्टंटसोबत अफेअर सुरू होतं आणि तो मला चीट करत होता.

'डेली स्टार' च्या वृत्तानुसार, महिलेने सांगितलं की, तो माझ्या शेजारी बसून त्या महिलेला मेसेज करत होता आणि विचारलं तर सांगायचा की, तो एका तरूणीसोबत बोलत आहे.

महिलेचं वय साधारण ३८ वर्षे आहे तर तिच्या पतीचं वय ४२ वर्षे आहे. दोघांच्या लग्नाला आठ वर्ष झालीत. तरीही तिचा पती आपल्या पत्नीला चीट करत आहे.

महिलेने सांगितलं की, घरातील कामात पतीने कधीच तिची मदत केली नाही. इतकंच नाही तर घरातील सगळी कामं तिच करत होती. बेडरूममध्येही त्याचीच मर्जी चालत होती आणि त्याच्या हिशेबाने तो माझा वापर करत होता.

महिलेने पुढे सांगितलं की, त्याने कधीच मला बेडवर संतुष्ट केलं नाही. नेहमीच विचारल्यावर कारण देत होता की, ऑफिसच्या कामामुळे तो थकला आहे.

महिलेने सांगितलं की, अलिकडे तिचा पती तिचा फार राग करू लागला होता. तो नेहमीच माझ्या कपड्यांबाबत नाखूश राहत होता. इतकंच काय तर माझ्या प्रत्येक कामातून त्याला समस्या होती. पण मला एका व्यक्तीने एक सल्ला दिला ज्याची मला फार मदत झाली.

महिलेने सांगितलं की, आपल्या पतीचे कपड धुताना मला त्याच्या पॅंटच्या खिशात एका ब्राइट पिंक कलरची अंडरविअर सापडली. पण मला धक्का बसला आणि जुने दिवस आठवले. आपल्या तरूणपणी माझा पती तरूणींपासून दूर पळत होता आणि त्याला कधीही गर्लफ्रेन्ड नव्हती.

महिलेने या घटनेनंतर पतीला काहीच विचारलं नाही, ना त्या अंडरविअरबाबत विचारलं. पण नंतर समजलं की, ती अंडरविअर त्याच्या असिस्टंटची होती. महिलेने सांगितलं की, माझा पती मला पागल समजतो आणि त्याला याचं अजिबात वाईट वाटत नाही की, त्याचं त्याच्या २३ वर्षीय असिस्टंटसोबत अफेअर आहे. महिला म्हणाली की, मला हे सगळं विसरायचं होतं. पण नंतर विचार केला की, या सर्वामुळे आमच्या मुलाला समस्यांचा सामना करावा लागेल.

यानंतर महिलेला डिअर डिड्रेकडून सल्ला देण्यात आला की, मुलासोबतच तुमची मेंटल हेल्थही गरजेची आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या पतीसोबत बोललं पाहिजे आणि त्या अंडरविअरबाबत विचारलं पाहिजे. तसेच पतीला सांगा की, त्याचं हे वागणं घरात चालणार नाही.