Woman always put ice cubes with clothes in washing machine dryer for drying cloths
वॉशिंग मशीनमध्ये कपड्यांसोबत बर्फाचे तुकडेही टाकायची ही महिला, कारण वाचून तुम्हीही हेच कराल! By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 02:06 PM2019-02-12T14:06:00+5:302019-02-12T14:11:48+5:30Join usJoin usNext सोशल मीडिया हा जसा आपल्या मित्रांशी संपर्क साधण्यासाठी मदत करतो. तसाच वेगवेगळी चांगली-वाईट माहिती मिळवण्यासाठीही फायदेशीर असतो. इतकंच नाही तर सोशल मीडिया आता अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं एक महत्त्वाचं साधन झालं आहे. यावर लोक आपली मतं शेअर करतात. तसेच अनेक वेगळ्या गोष्टीही शेअर करतात. असाच एक किस्सा सोशल मीडियात शेअर करण्यात आलाय. एका महिलेने शेजारी महिलेचा हा किस्सा शेअर केलाय. स्टेला नावाच्या महिलेने सांगितले की, तिची शेजारी महिला एकेदिवशी वॉश एरियामध्ये वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुवत होती. नंतर तिने कपडे सुकवण्यासाठी ड्रायरमध्ये टाकले आणि सोबतच बर्फांचे काही तुकडेही टाकले. त्या महिलेने कपड्यांसोबत बर्फाचे तुकडे का टाकले हे स्टेलाच्या काही लक्षात आलं नाही. त्यानंतर स्टेला नेहमीच त्या शेजारी महिलेचं हे काम पाहत होती. मग एक दिवस स्टेला शेजारी महिलेकडे गेली. आणि असं का करते याबाबत विचारले. शेजारी महिलेने सांगितले की, आपण महिला दररोज कितीतरी कपडे धुवत असतो. ते सुकवतो आणि नंतर त्यावर इस्त्रीही करतो. आणि कपाटातही ठेवतो. या संपूर्ण प्रोसेसमध्ये आपला पूर्ण दिवस जातो. पण या बर्फाच्या तुकड्यांनी या महिलेची एक समस्या सोडवली गेली आहे. शेजारी महिलेने स्टेलाला पुढे सांगितले की, कपडे धुतल्यानंतर त्यांवर सुरकुत्या किंवा मोडा पडलेल्या असतात. कपडे फारच चुरगळलेले असतात. पण नंतर त्यावर इस्त्री करावी लागते. इस्त्रीपण बरोबर होत नाही. अशात जर आपण कपडे ड्रायरमध्ये टाकताना त्यात थोडे बर्फाचे तुकडे टाकले तर कपड्यांवर चुरगळल्यासारखं राहणार नाही. आणि त्यांवर इस्त्री करण्याचीही गरज पडणार नाही. या महिलेने सांगितलं की, ड्रायरमध्ये कपडे सुकवण्यासाठी टाकताना त्यात थोडे बर्फाचे तुकडेही टाकायला हवेत. जेव्हा ड्रायरमधून गरम हवा निघते, तेव्हा बर्फाचे तुकडे वेगाने वितळतात. तसेच त्यातून स्टीम म्हणजेच वाफही निघते. वाफेमुळे कपड्यांवरील चुरगळपेपणा ठीक होतो आणि कपडे सुकल्यानंतर त्यावर काहीच करावं लागत नाही. म्हणजे त्यावर इस्त्री करायचीही गरज पडत नाही.टॅग्स :जरा हटकेसोशल मीडियाJara hatkeSocial Media