बोंबला! पतीनं हॉटेलच्या बाथरूमध्ये फोटो काढून तिला व्हॉट्सअॅप केला; अन् फोटो पाहताचं असं पित्तळ पडलं उघडं By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 02:00 PM 2021-02-19T14:00:46+5:30 2021-02-19T14:17:46+5:30
Woman divorced cheating husband : आपल्या पतीचा खोटारडेपणा lfvजगासमोर आणला आहे. सोशल मीडियावर तिनं आपली कहाणी लोकांसह शेअर केली आहे. असं म्हणतात की, खोटं बोलणारा कितीही चालाख असो, कोणत्या ना कोणत्या मार्गानं त्याचं खोटं वागणं बाहेर आल्याशिवाय राहत नाही. अमेरिकेतील एका महिलेनं आपल्या पतीचा खोटारडेपणा जगासमोर आणला आहे. सोशल मीडियावर तिनं आपली कहाणी लोकांसह शेअर केली आहे.
ऑफिस मीटिंगला जातोय असं पत्नीला सांगून हा माणूस दुसऱ्या महिलेसह एका हॉटेलच्या रुममध्ये होता. हॉटेलच्या बाथरूमधून फोटो काढून त्यानं पत्नीला तो फोटो पाठवला. हीच गोष्ट त्याच्या अंगाशी आली आहे.
त्याच्या पत्नीनं या फोटोत असं काही पाहिलं ज्यामुळे त्याची पोलखोल झाली आहे. पत्नीच्या धोकेबाजपणाचा व्हिडीओ तिनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. जवळपास ४० लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.
टिकटॉकवर प्रेमात धोका मिळाल्याची कहाणी व्हायरल होत आहे. आतापर्यंत असे व्हिडीओ वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून समोर आले आहेत. @shesough... नं आपल्या पतीचे दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमधून तिच्या पतीचा खोटारडेपणा दिसून येत आहे.
ऑफिसची मिटींग असल्याचं सांगून हा व्यक्ती घराच्या बाहेर गेला होता. त्यानं हॉटेलच्या वॉशरूममध्ये फोटो काढून आपल्या पत्नाीला पाठवला. शर्ट नसलेल्या या फोटोतून त्याला आपला हॉटनेस दाखवायचा होता. पण या फोटोमुळे आपला घटस्फोट होऊ शकतो अशी कल्पनाही त्यानं केली नव्हती.
या हॉटेलच्या वॉशरूमध्ये महिलेला हेअर स्ट्रेटनर दिसून आलं. हे स्ट्रेननर पाहताच त्या महिलेला कळलं की, आपला पती इतर महिलांसोबत एका खोलीत आहे.
स्ट्रेटनर व्यतिरिक्त एक निळ्या रंगाचा कंगवा सुद्धा याठिकाणी होता. महिलेनं जेव्हा आपल्या पतीचे फोटो इंटरनेटवर टाकले तेव्हा १३ हजारांपेक्षा जास्त लोकांना या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
अनेकांनी या माणसाच्या चुकीची खिल्ली उडवली आहे. एक युजरनं असं म्हटलं आहे की, कदाचित त्यांना माहीत नसावं की तो आपली बर्बादीची सेल्फी पाठवत आहे.
हे फोटो व्हायरल झाल्यानंतर या माणसानं स्पष्टीकरण दिलं आहे. त्यानं दिलेल्या माहितीनुसार, ही खोली त्याची नसून त्याच्या मित्राची होती. असा मित्र जो आपल्या पत्नीसह हॉटेलमध्ये थांबला होता. महिलेनं पतीच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता त्याला घटस्फोट दिला आहे.