आकाशात २ हजार फूट उंचीवर महिलेने दिला चिमुकलीला जन्म, आयुष्यभर फ्री राहणार विमान प्रवास By अमित इंगोले | Published: September 23, 2020 12:51 PM 2020-09-23T12:51:25+5:30 2020-09-23T12:58:54+5:30
ही घटना आहे इजिप्टएअर फ्लाइट MS777 मधील. हे विमान कैरोतून लंडनला जात होतं. या विमानात प्रवास करत होती यमनची एक महिला प्रवाशी जी गर्भवती होती. प्रवास करण्यासाठी सर्वात सोपं साधन विमान मानलं जातं. विमानाने तुम्ही सहज आणि कमी वेळेत तुमच्या ठिकाणापर्यंत पोहोचता. त्यामुळे अर्थातच विमान प्रवास जरा महागडा आहे. मात्र, नुकत्याच जन्माला आलेल्या एका चिमुकलीला आता आयुष्यभर विमान प्रवास फ्री राहणार आहे. तिला आयुष्यभर कधीही विमानाचं तिकीट काढावं लागणार नाहीय. कारण या चिमुकलीचा जन्मच प्रवासादरम्यान विमानात झालाय. त्यानंतर एअरप्लेन नियम आणि सुविधांनुसार तिला ही ऑफर देण्यात आली आहे.
विमानात जन्मलेल्या चिमुकलीची सध्या चर्चा सुरू आहे. तिने अचानक विमान प्रवासादरम्यान या विश्वात येऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय. सोबतच आयुष्यभरासाठी फ्री तिकीटही तिला मिळालं.
ही घटना आहे इजिप्टएअर फ्लाइट MS777 मधील. हे विमान कैरोतून लंडनला जात होतं. या विमानात प्रवास करत होती यमनची एक महिला प्रवाशी जी गर्भवती होती.
या महिलेचं नाव हियॅ नस्र नाजी दाबन असं आहे. तिच्या ड्यू डेटला वेळ होता. त्यामुळे ती लंडनला जात होती. पण तिच्या पोटात वाढत असलेल्या चिमुकलीच्या नशीबात काहीतरी वेगळंच होतं.
जशी विमानाने भरारी घेतलली थोड्याच वेळात महिलेच्या पोटात कळा येऊ लागल्या होत्या. पायलटला जेव्हा याबाबत सांगण्यात आले तेव्हा त्याने इमरजन्सी लॅंडींगची तयारी सुरू केली.
इमरजन्सी लॅंडींग म्युनिकमध्ये करण्यात आली. पण त्याआधीच विमान रनवेवर उतरण्याआधीच चिमुकलीचे हवेतच जन्म घेतला. विमानात असलेल्या एका प्रवाशी डॉक्टरने या महिलेची डिलेव्हरी केली.
चिमुकलीच्या जन्मानंतर विमान सेवेकडून ट्विटरवरून सर्वांना ही माहिती दिली. तसेच तिला आता इजिप्टएअरकडून आयुष्यभर प्रवास फ्री राहणार अशीही माहिती दिली.
दरम्यान ही अशी पहिलीच घटना नाही. याआधी २००९ मध्ये ३१ वर्षीय एअरएशियातील प्रवासी महिलेने विमानातच बाळाला जन्म दिला होता. त्यावेळी विमानात असलेल्या दोन नर्स आणि डॉक्टरांनी डिलेव्हरी केली होती. तेव्हा लिएव सिआव नावाच्या या महिलेच्या ड्यू डेटला ११ आठवड्यांचा कालावधी शिल्लक होता. पण अचानक तिला विमान हवेत असताना वेदना सुरू झाल्या होत्या. त्यांनाही फ्री प्रवास आहे.
तसेच गेल्यावर्षी आयरिश ट्रेनमध्ये जन्मलेल्या बाळाला ट्रेनकडून २५ वर्षे फ्री प्रवासाची सुविधा देण्यात आली होती.