महिलेला नखावरील सामान्य निशाणाकडे दुर्लक्ष करणं पडलं महागात, निघाला दुर्मिळ कॅन्सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 05:46 PM2021-06-28T17:46:22+5:302021-06-28T18:16:02+5:30

काहीवेळा एक चूक तुम्हाला फार महागात पडू शकते. तु्म्ही अनेकदा शरीरावर उमटणाऱ्या छोट्यामोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असाल पण हे तुम्हाला फार महागात पडू शकतं. या छोट्या गोष्टी एखाद्या मोठ्या आजाराची लक्षणही असू शकतात. त्यामुळे छोट्यामोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका...

तुम्हाला हे सांगण्याचं कारण म्हणजे ब्रिटनमधील अशाच एका महिलेला तिच्या नखांवर उमटलेल्या एका गोष्टीकडे दुर्लक्ष केले. ज्याचे फळ तिला भोगावे लागले.

एलेना सेवेर्स नावाच्या या महिलेने तीन वर्ष तिच्या नखावरील निशाण लाल नेलपॉलिशने लपवले.

३६ वर्षाच्या एलेनाला तिच्या नखावर असलेल्या निशाणामुळे फार लाज वाटायची. त्यानंतर तिने एक लेख वाचला आणि तिचा त्या निशाणाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. तिला वाटले की हे गंभीर असू शकते.

त्यानंतर ती डॉक्टरकडे गेली. डॉक्टरांनी तिला बायोस्पी करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांना असे आढळले कि तिला मेलानोमा आहे.

मेलोनामा हा एक प्रकारचा त्वचेचा कॅन्सर आहे आणि तो दुर्मिळ आहे.

पोस्टमार्थच्या क्विन अलॅक्झेंडर रुग्णालयात तिचं निशाण असलेलं अंगठ्याचं नख हटवण्यात आलं. त्याचबरोबर डॉक्टरांनी तेथील ५ मिमी पर्यंतचे कॅन्सरचे टिश्युसही काढून टाकले.

एलेना आता खुश आहे की आता तिच्या शरीरात कॅन्सरचा फैलाव रोखला गेला आहे.

हैंपशायरला राहणारी एलेना सांगते कि तिने लाल नेलपॉलिश लावून तिच्या नखावरील ते निशाण लपवलं. पण कॉस्मोपॉलिटिएन मॅग्झीन वाचल्यानंतर तिला धक्काच बसला.

तिने म्हटलं कि त्या मॅग्झीनमध्ये पाहिल्यानंतर तिथे जसा दाखवलेला तसाच निशाण माझ्या नखावर होता. म्हणून मी लगेच त्याचा फोटो काढुन माझ्या पार्टनरला पाठवला.

तेव्हा मला समजले की या निशाणाकडे दुर्लक्ष करून मी किती मोठी चूक करत होते.