पुरूषांसारखे मजबूत आहे या तरूणीचे बायसेप्स, लोक बघण्यासाठी देतात पैसे!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 10:28 AM2023-05-08T10:28:08+5:302023-05-08T10:32:51+5:30

Vladislava Galagan : तुम्ही अनेकदा पुरूषांना जिममध्ये बायसेप्स बनवताना पाहिलं असेल, पण एखाद्या तरूणीचे असे बायसेप्स पाहिले नसतील.

Woman has strong biceps like men: आजकाल कोणत्याही क्षेत्रात महिला मागे नाहीत. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून त्या काम करतात. बॉडी बिल्डींगमध्येही महिला मागे नाहीत. अशाच एका 27 वर्षीय तरूणीने बायसेप्स बघून तरूणही लाजतील. 11 वर्षांच्या मेहनतीनंतर तिने असे मसल्स तयार केले आणि याद्वारे ती आता लाखो रूपयांची कमाई करत आहे. लोक केवळ तिचे बायसेप्स बघण्यासाठी हजारो रूपये द्यायला तयार असतात.

तुम्ही अनेकदा पुरूषांना जिममध्ये बायसेप्स बनवताना पाहिलं असेल, पण एखाद्या तरूणीचे असे बायसेप्स पाहिले नसतील. आज आम्ही तुम्हाला अशा एका तरूणीबाबत सांगणार आहोत जिने एक्सरसाइज करून मजबूत बॉडी तर बनवलीच सोबतच याद्वारे ती पैसेही कमावत आहे.

व्लादिस्लावा गॅलागन (Vladislava Galagan) असं या तरूणीचं नाव असून ती एक रशियन मॉडल आहे. ती 27 वर्षांची असून गेल्या 11 वर्षापासून ती बॉडीबिल्डींगसाठी मेहनत घेत आहे. 2018 पासून व्लादिस्लावाने बॉडीबिल्डींग स्पर्धांमध्ये भाग घेणं सुरू केलं होतं.

मिररच्या रिपोर्टनुसार, व्लादिस्लावाला सोशल मीडियावर तिच्या मसल्समुळे लोकप्रियता मिळाली. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. ज्यामुळे तिचे फॉलोअर्स खूप आहेत.

गेल्यावर्षी तिने OnlyFans जॉइन केलं होतं आणि इथे तिने तिचा कंटेंट टाकणं सुरू केलं होतं. फिटनेस मॉडल म्हणून तिचे बायसेप्स आणि बॉडीबिल्डींग बघणं लोकांना आवडतं. यातूनच ती लाखो रूपयांची कमाई करत आहे.

ती म्हणाली की, असे बरेच लोक आहेत ज्यांना उंच आणि मसल्स असलेल्या सुंदर मुली आवडतात. पण बऱ्याच लोकांना तिचे मसल्स फोटोशॉप्ड वाटतात. पण तिने स्पष्ट सांगितलं की, ती एक फिटनेट मॉडल आहे आणि तिने मेहनतीने ही बॉडी बनवली आहे.

चांगली डाएट आणि आठवड्यातील 6 दिवस तासंतास जिममध्ये घाम गाळल्यानंतर तिने ही बॉडी बनवली. लोकांना तिचे आर्म रेस्लिंग व्हिडीओ आवडतात. (All Photos Credit- Instagram/vladigalagan)