बाबो! कान नव्हे हे तर रबर, खेचुन इतके मोठे केले की आता म्हणतेय वर्ल्ड रेकॉर्डच करेन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 07:22 PM2022-03-04T19:22:38+5:302022-03-04T19:31:44+5:30

वयाच्या तेराव्या वर्षांपासून ही महिला कानाची पाळी खेचू लागली आणि आता तिला याचा वर्ल्ड रेकॉर्ड करायचा आहे.

आपण प्रसिद्ध व्हावं असं प्रत्येकाला यासाठी लोक काय काय नाही करत. प्रसिद्धीसाठी असंच काही विचित्र करणारी एक महिला सध्या चर्चेत आहे. जी आपल्या कानांमार्फत फेमस होण्यासाठी धडपड करते आहे.

24 वर्षांची बियांका फेरो(Bianca Ferro) अमेरिकेच्या न्यू जर्सीमध्ये राहते. ती एक टॅटू आर्टिस्ट आहे. शरीरात बदल करण्याची तिला हौस आहे.

शालेय वयापासून तिला आपले कान खेचण्याची सवय होती (Woman stretches earlobes to extreme length). हीच सवय तिची हौस बनवली आणि आता याचाच तिला वर्ल्ड रेकॉर्डही करायचा आहे.

बियांकाला आपले कान खेचून असे लांब करण्यापासून तिच्या कुटुंबाने तिला रोखलं पण तरी तिने काही ही सवय सोडली नाही.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार तिला आपल्या कानांमार्फत जगात आपली ओळख बनवायची आहे. त्यामुळे वयाच्या तेराव्या वर्षापासून तिने कानाचा छेद असलेला भाग वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

आतापर्यंत तिने आपले कान खेचून खेचून 3.3 इंच म्हणजे 86 मिलीमीटर लांब केले आहेत. वर्ल्ड रेकॉर्डसाठी तिला तिचे कान 4.1 इंच म्हणजे 105 मिलीमीटर लांब करायचे आहेत.

कान लांब करण्यासाठी तिचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी ती आपल्या कानात विचित्र दागिनेही घालते. आपले कान आपल्याला खूप आवडतात आणि हळूहळू ते आणखी लांब होतील आणि आपण विश्वविक्रम करू असा विश्वास तिला आहे.