सर्व समजत होते हिला ९ महिन्यांची गर्भवती पण डॉक्टरने जे सांगितले ते ऐकुन सर्व झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 06:40 PM2021-08-18T18:40:20+5:302021-08-18T19:08:20+5:30

ब्रिटनमधील ही १९ वर्षाची तरुणी ९ महिन्यांची गर्भवती दिसत होती. जेव्हा ती डॉक्टरकडे हे तपासण्यासाठी गेली तेव्हा डॉक्टरने तिला जे काही सांगितले ते ऐकुन तिच्यासकट सर्वांना जबरदस्त धक्का बसला...

एक १९ वर्षाची मुलगी तिच्या लठ्ठपणामुळे खुप चिंतीत होती. तिने व्यायाम, डाएटपर्यंत सर्व काही केले पण काही केल्या तिचे वजन कमी होत नव्हते.

त्जा मुलीनं डॉ़क्टरकडे जायचा निर्णय घेतला. जेव्हा ती डॉक्टरकडे गेली तेव्हा असं सत्य बाहेर आलं की तिच्यासकट सर्वजणांना धक्का बसला.

ब्रिटनमध्ये राहणारी अबी चाडविक तिच्या वाढलेल्या पोटामुळे त्रस्त होती. तिला सर्वजण ९ महिन्यांची गर्भवती म्हणायचे. काही करून तिचे पोट कमी होत नव्हते.

जेव्हा ती डॉक्टरकडे गेली तेव्हा तिला समजले की तिच्या पोटात फुटबॉलच्या आकाराची गाठ आहे. ज्यामुळे तिचे पोट फुगलेले होते. या कारणास्तव सर्वजण तिला ९ महिन्यांची गर्भवती म्हणत असत.

डॉक्टरांनी म्हटलं कि तिच्या लठ्ठपणामुळे ही गाठ तिच्या पोटात झाली आहे. ही गाठ फुटबॉलच्या आकाराची आहे.

ही गाठ जर मोठी झाली असती तर तिला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागले असते. त्यामुळे तिनं ऑप्रेशन करून ती गाठ काढुन टाकली.

अबी चाडविक हिने एप्रिल २०१२ मध्ये या गाठीचं ऑप्रेशन केलं व डॉक्टरांनी ही गाठ बाहेर काढली.

अबीने मिरर न्युजशी बोलताना सांगितलं की, जेव्हा ही गाठ तिच्या पोटात होती तेव्हा तिला तिचं पोट दगडासारखं कडक वाटायचं. मी बाहेर जायचे तर लोक मला ९ महिन्यांची गर्भवती म्हणत.

या गाठीला सर्वप्रथम डॉक्टर किडनी स्टोन समजत होते. त्यांना असं वाटलं की किडनी स्टोनमुळे तिचं पोट दुखंतय.

आता डॉक्टरांनी ही गाठ काढली आहे आणि मला बरं वाटतंय असंही अबी म्हणाली.