टाइमपाससाठी महिलेनं खरेदी केलं लॉटरीचं तिकिट अन् बनली करोडपती! By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 05:56 PM2021-07-30T17:56:05+5:302021-07-30T18:04:11+5:30Join usJoin usNext lottery jackpot : फ्लोरिडामध्ये या महिलेने एक मिलियन डॉलर्सची लॉटरी जॅकपॉट जिंकली. अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये एका महिलेची फ्लाइट कॅन्सल झाली आणि तिच्यासाठी ती नशिबवान ठरली. कारण, तिने जवळपास 8 कोटींची लॉटरी जिंकली. लॉटरीद्वारे कोट्यावधी बनलेल्या या महिलेने सांगितले की, तिला स्वप्नातही असे वाटले नव्हते. फ्लोरिडामध्ये या महिलेने एक मिलियन डॉलर्सची लॉटरी जॅकपॉट जिंकली. या महिलेने असा दावा केला आहे की, तिची फ्लाइट अनपेक्षितरित्या रद्द झाली नसती तर तिने कधी लॉटरीचे तिकिट खरेदी केले नसते. कॅनसस सिटीमध्ये राहणाऱ्या 51 वर्षीय अँजेला कारवेला यांनी फ्लोरिडा लॉटरीच्या अधिकाऱ्यांना सांगितले की, त्यांनी अपेक्षेपेक्षा जास्त वेळ फ्लोरिडामध्ये घालवला. कारण त्यांची फ्लाइट रद्द झाली होती. दरम्यान, अँजेला कारवेला यांनी टाइमपास करण्यासाठी काही स्क्रॅच ऑफ लॉटरी तिकिटे खरेदी केली. "माझी फ्लाइट अनक्षेपितपणे रद्द झाल्यानंतर काहीतरी अजब घडणार आहे, असे मला वाटत होते", असे अँजेला कारवेला म्हणाल्या. त्या म्हणाल्या, "मी टाइमपास करण्यासाठी काही स्क्रॅच ऑफ तिकिटे खरेदी केली आणि त्यानंतर मी दहा लाख डॉलर्स म्हणजेच 7 कोटी 43 लाख 70 हजार 50 रुपये जिंकले." अँजेला कारवेला यांनी द फास्टेस्ट रोडवरील ब्रँडनमधील पब्लिक स्टोअरमधून खरेदी केलेल्या 1,000,000 डॉलरच्या स्क्रॅच-ऑफ तिकिटावर अव्वल पुरस्कार मिळविला. लॉटरी जिंकणाऱ्या अँजेला कारवेला यांनी तल्हासी येथील लॉटरी मुख्यालयाला भेट दिली आणि जिंकलेली रक्कम एकाचवेळी घेण्याचा निर्णय घेतला.टॅग्स :अमेरिकाAmerica