एकेकाळी अफगाणिस्तानच्या स्त्रिया होत्या खूप मॉर्डन, स्टाईल आणि फॅशनची राजधानी होती काबूल... By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 12:49 PM 2021-08-17T12:49:10+5:30 2021-08-17T17:42:59+5:30
तालिबान्यांची सत्ता येण्यापुर्वीचा ६०-७०च्या दशकातील अफगाणिस्तान वेगळा होता. आज जशी स्त्र्यियांवर अमानुष बंधने आहेत ती त्या काळी नव्हती. त्याकाळी स्त्रियांना समान दर्जा दिला जात असे. शिक्षण घेण्यापासून ते नोकरी करण्यापर्यंतचे सर्व अधिकार स्त्रियांना होते. स्त्रियांची त्याकाळातील लाईफस्टाईल जर तुम्ही पाहिली तर तुमच्या हे चटकन लक्षात येईल. अफगाणिस्तानच्या राजधानी काबुलवर तालिबान्यांनी आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी देश सोडून पळाले आहेत. अफगाणिस्तानातील जनता आता भीतीच्या सावटाखाली आहे.
अफगाणिस्तानमधीन जनता येथुन पळण्याचा प्रयत्न करते आहे कारण महिलांवर येणारी अमानुष बंधने.महिलांना केवळ घरातून बाहेर पडण्यावरच बंदी नव्हती तर नोकरी करणेही अमान्य होते. बुरखा न घातल्यास त्यांना सर्वांच्यादेखत मारहाण केली जायची.
मात्र काही दशकांपूर्वी अफगाणिस्थानमध्ये परिस्थीती वेगळी होती. अफगाणिस्तानच्या संस्कृतीत आधुनिकीकरणाचा मिलाफ पाहायला मिळत होता.
अमेरिकेचे नागरिक आणि डॉक्टर बिल पोडलिच त्यांच्या दोन मुली व पत्नीसमवेत १९६७ साली अफगाणिस्तानात आले होते. तेव्हा त्यांना अफगाणिस्तानच्या संस्कृतीचं फार कौतुक वाटलं होतं. त्यांनी अफगाणिस्तानातील लाफईस्टाईलचे फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद केले होते.
त्याकाळी बिल अफगाणिस्तानमध्ये हायर टिचर्स कॉलेजमध्ये शिकवत. तर त्यांच्या मुली काबुलमधीलच अमेरिकन इंटरनॅशनल स्कुलमध्ये शिकत होत्या. त्यांच्यासोबत अनेक आंतरराष्ट्रीय विद्यार्थी शाळेत शिकत. ते तिथे कामही करत होते. बिल कॉलेजमध्ये २ वर्ष शिकवायला होते.
या शिवाय सॅन जोस युनिवर्सिटीचे इंजिनियरिंगचे प्राध्यापक मोहम्मह हुमायुं कयुमी यांनीही अफगाणिस्तानच्या तत्कालीन लाईफस्टाईसचे फोटो काढले होते. त्यांच्या 'वन्स अपॉन अ टाईम इन अफगाणिस्तान' या फोटो एसे बुकमध्ये त्याकाळातील आधुनिक अफगाणिस्तानचे फोटो आहेत
या पुस्तकामध्ये ६०-७० दशकातील अफगाणिस्तानमधील महिलांचे फोटो आहेत. ज्यात महिला शॉर्ट स्कर्ट घालु शकत होत्या. महिलांवर कोणत्याही प्रकारची बंधने नव्हती.
त्याकाळी महिला रस्त्यावर कोणतीही भीती न बाळगता फिरु शकत होत्या. विद्यापीठांमध्ये जाऊन उच्च शिक्षण घेऊ शकत होत्या. तो काळ स्त्रियांसाठी बंधनमुक्त होता.
साल २००१ मध्ये ब्युरो ऑफ डेमोक्रसी, ह्युमन राईट्स अँड लेबरच्या स्टेट डिपार्टमेंटच्या रिपोर्टनुसार १९२० साली महिलांना मतदान देण्याचा अधिकार देण्यात आला होता. त्यावेळी संविधानाने महिलांना समान दर्जा दिला होता.
७०च्या दशकात ७० टक्के महिला शिक्षिका होत्या. ५० टक्के सरकारी कर्मचारी महिला होत्या आणि ४० टक्के डॉक्टरसही महिला होत्या. मात्र १९९० नंतर सर्व परिस्थीती बदलली.