हे आहेत जगातील सर्वात जास्त जगणारे श्वान, शेवटचा तर अनेकांचा फेवरेट अन् खास मित्र By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 04:49 PM 2022-05-31T16:49:52+5:30 2022-05-31T17:25:16+5:30
अनेकांना पाळीव प्राणी आवडतात. त्यातही विशेष कुत्रा जास्त पाळला जातो. पण तुम्हाला माहित आहे का सर्वात जास्त आयुष्य असणाऱ्या कुत्र्यांच्या जाती कोणत्या आहेत? द सन च्या रिपोर्टनुसार रसेल टेरियर्स हा कुत्र्यांच्या विविध जातींमध्ये सर्वात जास्त जगणारा कुत्रा आहे. हा १२.७ इतकी वर्ष जगतो.
यॉर्कशायर टेरियर्स हे १२.५ वर्षे जगतात. हे कुत्रे जितके दिसायला क्युट असतात तितकेच समजुतदारही असतात. त्यामुळे अनेकांना हा पाळायला खुप आवडतो.
बॉर्डर कोलिस हा या यादीतील तिसऱ्या क्रमांकाचा कुत्रा आहे. तो १२.१ वर्ष जगतो. याला घराचा व शेतीचा राखणदार म्हणून जास्त पसंती दिली जाते.
अत्यंत आज्ञाधारक कुत्रा म्हणून स्प्रिंगर स्पॅनियलची ओळख आहे. उत्तम अॅथलिट तसेच ट्रेकर म्हणून प्रसिद्ध असलेली या कुत्र्याची जात ११.९ महिने जगते.
बुलडॉगची क्रॉस ब्रीडींग असलेला हा कुत्रा फ्रेंच बुलडॉग म्हणून प्रसिद्ध आहे. हा ४.५ वर्ष जगतो.
सर्वांचा फेवरेट असलेला लॅब्राडोर ११.८ वर्ष जगतो. युके मध्ये विकसित करण्यात आलेल्या या ब्रीडला तेथील एका ठिकाणावरुन हे नाव पडलेले आहे.