काय सांगता! जगातली तिसरी सर्वात श्रीमंत व्यक्ती राहते केवळ ३७५ स्क्वेअर फुटांच्या घरात, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 01:38 PM2021-07-08T13:38:01+5:302021-07-08T13:45:49+5:30

Elon Musk : जगातले तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि स्पेस एक्ससारख्या कंपनीने मालक एलन मस्क अमेरिकेच्या टेक्सास शहरात आपल्या छोटाशा घरात राहतात.

जेव्हाही जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींचा विषय निघतो, तेव्हा त्यांच्या शाही लाइफस्टाईल, बंगल्यांचा विषय निघतोच. मात्र, जगातल्या तिसऱ्या सर्वात श्रीमंत व्यक्तीची विचार याबाबत फार वेगळे आहेत. ही व्यक्ती सध्या एका फारच छोट्या घरात राहतात.

जगातले तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि स्पेस एक्ससारख्या कंपनीने मालक एलन मस्क अमेरिकेच्या टेक्सास शहरात आपल्या छोटाशा घरात राहतात. हे घर केवळ ३७५ स्क्वेअर फूटाचं आहे. आणि या घराची किंमत ५० हजार डॉलर्स म्हणजे जवळपास ३८ लाख रूपये इतकी आहे.

५० वर्षीय एलन मस्कने एका ट्विटच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. मस्क यांचं हे घर बॉक्सेबल कंपनीने तयार केलं आहे. या कंपनीचा उद्देश अशा घरांचं निर्माण करणं आहे ज्यांना कुठेही शिप करण्याची सुविधा असेल.

ही कंपनी छोटे पण स्टायलिश घर बनवण्यासाठी ओळखली जाते. मस्क यांचं घरही एका स्टुडिओ अपार्टमेंटसारखं आहे ज्यात एक किचन, बेडरूम, बाथरूम आणि ओपन प्लान लिविंग एरिया आहे. या कंपनीचा उद्देश लहान पण हायटेक सुविधा असलेले घर तयार करण्याचा आहे.

या कंपनीने सह-संस्थापक गॅलियेनो टिरामानी न्यूयॉर्क पोस्टसोबत बोलताना म्हणाले की, आमच्या कंपनीचा गोल मोठ्या प्रमाणात घर तयार करणे हा आहे आणि ते स्वस्त दरात लोकांना उपलब्ध करून देणं हा आहे. आम्हाला आमच्या या प्रोजेक्टच्या माध्यमातून जगभऱात घर खरेदीची एक सहज आणि स्वस्त प्रक्रिया बनवायची आहे.

मस्क हे गेल्यावर्षापासून त्यांच्या प्रॉपर्टी आणि जमिनी विकत आहेत. ते या बाबतीत ट्विट करून म्हणाले आहे की, त्यांना मंगळ ग्रहावर फोकस करायचा आहे. त्यांनी मे २०२० मध्ये एक ट्विट करत सांगितलं होतं की, मी माझ्या जवळपास सर्वच प्रॉपर्टी विकत आहे आणि मी कोणत्याही घराचा मालक राहणार नाही.

दरम्यान गेल्या १३ महिन्यात मस्क यांनी त्यांच्या ६ हाय प्रोफाइल प्रॉपर्टी विकल्या आहेत. त्यासोबतच त्यांनी २०१९ मद्येही आपली एक प्रॉपर्टी विकली होती. मस्क यांनी ही प्रॉपर्टी ११४ मिलियन डॉलर्सला विकली होती.

एलन मस्क यांनी जो रोगनच्या पॉडकास्टमध्ये याबाबत सांगितलं होतं. ते म्हणाले होते की, मला वाटतं की, खूपसारी संपत्ती मिळवणं कुठेना कुठे तुमची व्हॅल्यू कमी करते. याने लोकांना तुमच्यावर निशाणा साधायला संधी मिळते. मी एक खरबपती आहे, पण माझ्याकडे एकही घर नाही. मला वाटतं हे इंटरेस्टींग आहे.

Read in English