Worlds Five Most Dangerous Paths That Barely The Bravest Would Attempt
हा आहे मृत्यूचा मार्ग! जगातील सर्वात धोकादायक रस्ते; उडेल तुमच्या अंगाचा थरकाप By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 01:12 PM2019-09-18T13:12:37+5:302019-09-18T13:17:44+5:30Join usJoin usNext रस्त्यांवरुन चालण्याचा अनुभव सगळ्यांनाच असेलच. खड्डे पडलेले रस्ते असो वा खडकाळ रस्ते माणूस त्यातून चालू शकतो. मात्र आम्ही तुम्हाला अशा रस्त्यांबाबत सांगणार आहोत की, या रस्त्यावरुन चालताना जीव मुठीत घेऊन चालावं लागतं. या रस्त्यावरुन जाणाऱ्याचा मृत्यू कधी होईल सांगता येत नाही. त्यामुळे या रस्त्यावरुन चालताना तुमचाही थरकाप उडेल. चीनमधील हुशान क्लिफसाइड हे हुशान नदीवर असलेला हा रस्ता, 1614 मीटरवर हुशानचं उत्तर टोक आहे. याठिकाणी अनेक लोक येत असतात. सरकारने लोकांच्या सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत मात्र तरीही दरवर्षी येथे अपघात होतात. चीनमधील हुनान प्रांतातील युएयांगमध्ये चीनच्या स्पाइडरमॅन आर्मीने 300 मीटर उंचीवर हा रस्ता बनविला आहे. हा रस्ता पाहिला तर तुम्हीही काही क्षण श्वास रोखून धराल. स्पेनच्या दक्षिण क्षेत्रात 110 वर्ष जुने एल केमिनिटो डेल रे मार्ग आहे. जगातील सर्वाधिक धोकादायक हा रस्ता मानला जातो. किंग्स पाथ वे या नावाने हा रस्ता ओळखला जातो. 1905 साली हा रस्ता बनविण्यात आला होता. 2000 साली हा रस्ता बंद करण्यात आला. हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांटच्या कर्मचाऱ्यांसाठी हा रस्ता बनविण्यात आला होता. फ्रान्सच्या अल्पस सेंट पियरे डि इंट्रिमॉन्टमध्ये रोच वेयरांड येथे जाणं सर्वांच्या नशिबी येत नाही. याठिकाणी अनेक थरकाप उडणाऱ्या घटना घडल्या आहेत.