Photo : अबब! स्वीमिंग पूल आहे की समुद्र, यात बोटीने फिरतात पर्यटक...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 03:53 PM2024-08-10T15:53:15+5:302024-08-10T16:21:36+5:30

World's Biggest Swimming Pool : चिलीमधील जगातील सगळ्यात मोठा स्वीमिंग पूल इतका मोठा आहे की, एखाद्या विशाल तलावासारखा किंवा नदीसारखा दिसतो.

World's Largest Swimming Pool: जगातील सगळ्यात मोठा स्वीमिंग पूल चिलीच्या एलगारोबोमध्ये आहे. हा पूल सॅन एलफान्सो डेल मार नावाच्या रिसॉर्टचा आहे. हा स्वीमिंग पूल इतका मोठा आहे की, यात तुम्ही बोटने प्रवासही करू शकता.

चिलीमधील जगातील सगळ्यात मोठा स्वीमिंग पूल इतका मोठा आहे की, एखाद्या विशाल तलावासारखा किंवा नदीसारखा दिसतो. या पूलजवळ उभं राहिलं तर सगळीकडे केवळ पाणीच पाणी दिसतं.

चिलीच्या एलगारोबोमधील सॅन एलफान्सो डेल मार रिसॉर्टचा हा स्वीमिंग पूल इतका मोठा आहे की, त्याचं गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्यात आलं आहे.

हा स्वीमिंग पूल ८० एकर जमिनीवर बनवण्यात आला आहे आणि १ किलोमीटरपेक्षा जास्त लांब आहे. या पूलचा आकार इतका मोठा आहे की, यात १६ फुटबॉलचे मैदाना सामावू शकतात. इतकंच नाही तर हा पूल खूप खोलही आहे. या पूलचा सगळ्यात खोल भागाची खोली ११५ फूट आहे.

जगातील या सगळ्यात मोठ्या पूलमध्ये नेहमीच ६६ मिलियन गॅलन पाणी भरलेलं असतं. कॉम्प्युटरने संचालित सक्शन आणि फिल्ट्रेशन सिस्टीमने पूल साफ ठेवला जातो. या सिस्टीमने समुद्रातील पाणी खेचून पूलमध्ये आणलं जातं.

या स्वीमिंग पूलमध्ये केवळ रिसॉर्टमध्ये थांबलेले लोकच जाऊ शकतात. बाहेरील लोक या पूलचा वापर करू शकत नाहीत. हा स्वीमिंग पूल इतका मोठा आहे की, लोक यात बोटिंगचा आनंदही घेतात.

या स्वीमिंग पूलमध्ये कुणी बुडू नये म्हणून सुरक्षेची खास व्यवस्थाही करण्यात आली आहे. पूलच्या चारही बाजूने गार्ड आहेत. जे लोकांची मदत करतात.

हा स्वीमिंग पूल तयार करण्यासाठी १६ हजार कोटी रूपये खर्च आला. हा पूल डिसेंबर २००६ मध्ये तयार झाला होता. तेव्हा हा पूल सामान्य लोकांसाठीही खुला करण्यात आला होता.