The world's largest teeth extracted from a student's mouth; Even the doctors shocked pnm
अबब! विद्यार्थ्याच्या तोंडातून काढला जगातील सर्वात मोठा दात; लांबी पाहून डॉक्टरही झाले चकीत By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 03:24 PM2020-03-05T15:24:04+5:302020-03-05T15:30:38+5:30Join usJoin usNext मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये इंजिनिअर करणाऱ्या एका विद्यार्थ्यांच्या तोंडातून ३९ मिमी लांबीचा दात काढला. हा जगातील सर्वात मोठा मनुष्याचा दात आहे असा दावा डॉक्टरांनी केला आहे. या दाताची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात येणार आहे. इंजिनिअर विद्यार्थ्यांच्या तोंडातून एवढा मोठा दात बाहेर काढल्याने खरगोनमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. या दाताची लांबी ३९ मिलीमीटर आहे. आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ३७.३ मिलीमीटरच्या मोठ्या दाताची नोंद आहे अशी माहिती डॉ. सौरभ श्रीवास्तव यांनी दिली. गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड रेकॉर्डमध्ये २०१९ मध्ये जर्मनीतील डेंटिस्ट मैक्स लुक्स यांच्यावर नावावर सर्वात मोठा दात काढण्याचा रेकॉर्ड आहे. लुक्स यांनी ३७.२ मिमी लांबीचा दात काढला होता. डॉक्टर मैक्स लुक्स यांनी गुजरातमधील डॉ. जमिन पटेल यांचा ३६.७ मिमी लांबीचा दात काढण्याचा रेकॉर्ड मोडला होता. आता जर्मनीतील डॉक्टर लुक्स यांचा रेकॉर्ड मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील डॉ. सौरभ श्रीवास्तव यांनी मोडल्याचा दावा केला आहे. २९ फेब्रुवारीला डॉ. सौरभ श्रीवास्तव यांच्याकडे इंजिनिअरचा विद्यार्थी पवन भावसार दात दाखवण्यासाठी आला होता. मोठ्या दातामुळे पवनचा चेहरा चांगला दिसत नसल्याने तो चिंतेत होता. पवनचा ८ दिवसांपूर्वी दात काढण्यात आला. त्याची लांबी ३६ मिमी होती. मात्र दुसरा दात दुख:त होता तो पुन्हा डॉ. सौरभ यांच्याकडे आला. त्यावेळी दुसरा दात काढला त्याची लांबी ३९ मिमी. होती. ३९ मिमी जगातील सर्वात मोठा दात आहे असा दावा डॉक्टर सौरभ श्रीवास्तव यांनी केला आहे. त्यामुळे लवकरच याची नोंद वर्ल्ड रेकॉर्डसाठी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सामान्यपणे दाताची लांबी २८ मिमी इतकी असते. मात्र या दाताची लांबी खूपच जास्त आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. टॅग्स :डॉक्टरdoctor