Worlds longest sea bridge is China
चीनमध्ये तयार झाला जगातला सर्वात लांब समुद्री पूल By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 12:22 PM2018-09-28T12:22:11+5:302018-09-28T12:26:38+5:30Join usJoin usNext चीनमध्ये जगातला सर्वात लांब समुद्री पुलावरुन लवकरच ट्रायल रन सुरु करण्यात येणार आहे. ५५ किलोमीटर लांब हॉंगकॉंग-झूहाई-मकाऊ पुलाचं काम २०११ मध्ये सुरु झालं होतं. ८ अरब डॉलर खर्च आलेल्या पुलाचं काम गेल्यावर्षी पूर्ण झालं होतं. पण हा वाहतूकीसाठी खुला झाला नव्हता. हा पूल अनेक गोष्टींनी खास आहे. यासाठी केबल ब्रिज, अंडरसी टनल आणि आर्टिफिशल आयलंडसहीत अनेक खास गोष्टी आहेत. ट्रायल रनसाठी ४० वाहनांना रवाना केलं जाणार आहे. जर सगळंकाही ठिक राहिलं तर पुढच्या महिन्यात हा पूल वाहतूकीसाठी खुला करण्यात येऊ शकतो. हा छोटा प्रोजेक्ट नाहीये. या पुलाच्या माध्यमातून इंडस्ट्रिअल शहर मकाऊ, हॉंगकॉंग आणि झूहाई ही शहरं जोडली जाणार आहेत. झूहाई शहराला हार्डवेअरची सिलिकॉन व्हॅली म्हटलं जातं. या पुलाचं उद्योगासोबतच राजकीय महत्त्वही आहे. हॉंगकॉंग स्वत:ला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीवादी देश मानतो. पण हे स्वतंत्र राष्ट्र नाहीये. हा देश चीनच्या विशेष प्रशासकिय सीमांमध्ये आहे. कागदपत्रांव्दारे चीन म्हणतो की, आम्ही हॉंगकॉंगच्या अंतर्गत बाबींमध्ये लक्ष देणार नाही. पण असे नाहीये. या पुलाच्या माध्यमातून चीनची पोहोच सोपी झाली आहे. या पुलाचं काम २०११ मध्ये सुरु झालं होतं आणि २०१६ मध्ये याचं उद्घाटन झालं होतं. पण वेगवेगळ्या कारणांनी या पुलाचं काम लांबलं होतं. टॅग्स :चीनआंतरराष्ट्रीयchinaInternational