World's safest place!
जगातील सर्वात सुरक्षित ठिकाण ! By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 05:38 PM2019-02-28T17:38:55+5:302019-02-28T17:52:09+5:30Join usJoin usNext जर तुम्ही गुगलवर जगभरातील सर्वात मजबूत आणि सुरक्षित ठिकाण कोणतं? असे शोधला तर तुम्हाला उत्तर मिळेल, फोर्ट नॉक्स. फोर्ट नॉक्समध्ये अमेरिकेचा खजिना तर ठेवला आहेच सोबतच हे ठिकाण एक मिलिट्री बेसही आहे. याच्या सरक्षेसाठी 30 हजार जवान तैनात आहेत. अमेरिका ज्या ज्या शस्त्रास्त्रांचा युद्धात वापर करते, ती सगळी शस्त्रास्त्रे या इमारतीच्या सुरक्षेसाठीही आहेत. फोर्ट नॉक्स अमेरिकेची एक मोठी तिजोरी आहे. याठिकाणी जवळपास 50 हजार टन सोने ठेवण्यात आले आहे. फोर्ट नॉक्स या तिजोरीच्या दरवाज्याचे वजन 22 टन इतके आहे. हा दरवाजा उघडण्यासाठी अर्थातच पासवर्डची गरज असते. हे पासवर्ड वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये असतात. काही लोक सोडता कुणालाच पूर्ण कोड माहिती नसतो. 1936 मध्ये फोर्ट नॉक्सची इमारत बांधण्यात आली आहे. याठिकाणी सुरक्षा रक्षकांसह कॅमेऱ्यांचा कडक बंदोबस्त आहे. त्यासोबतच येथे सुरक्षेसाठी रोबोट्सचाही वापर केला जातो. टॅग्स :जरा हटकेअमेरिकासोनंJara hatkeAmericaGold