Wuhan man gains 224 pounds within five months while remaining home-bound due to coronavirus crisis
अगडबम : लॉकडाऊनमुळे त्याला बनवलं शहरातील सर्वात 'वजन'दार व्यक्ती! By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 03:45 PM2020-06-13T15:45:57+5:302020-06-13T15:50:24+5:30Join usJoin usNext जगभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आतापर्यंत 77 लाख 58,209 कोरोना रुग्ण जगभरात आढळले आहेत. त्यापैकी 39 लाख 75,577 रुग्ण बरे झाले आहेत आणि 4 लाख 28,633 रुग्णांना प्राण गमवावे लागले. जेथून कोरोना व्हायरस निर्माण झाल्याचा दावा केला जात आहे, ते वुहान शहर मात्र कोरोनामुक्त झाले आहे. येथे जवळपास पाच महिने लॉकडाऊन करण्यात आले होते. चीनमध्ये आता केवळ 74 कोरोनाची अॅक्टीव्ह केस आहेत. चीननं कोरोनामुक्तीकडे यशस्वी वाटचाल केली असली तरी तेथील लोकांना वेगळ्याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे. लॉकडाऊमुळे घरातच बसावं लागलेल्या लोकांचं वजन प्रचंड वाढल्याचं समोर येत आहे. त्यापैकी एक प्रकरण हे अत्यंत गंभीर आहे. वुहान शहरातील 26 वर्षीय तरूणाचं वजन जवळपास 102 किलोनं वाढलं आहे आणि त्याला आता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. झोऊ असे या तरूणाचे नाव आहे आणि चिंताजनक अवस्थेत त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. झोऊचे वजन आता 280 किलो झाले असून वुहान शहरातील तो सर्वात वजनदार व्यक्ती झाला आहे. झोऊ हा शहरातील इंटरनेट कॅफेत काम करायच. पण, लॉकडाऊनमुळे जानेवारीपासून तो घराबाहेर पडलेला नाही. वुहानमधील लॉकडाऊन एप्रिलमध्ये हटवण्यात आला, परंतु झोऊला बाहेर पडायलाच जमत नव्हते. वुहान विद्यापिठातील झोंगनान हॉस्पिटलच्या वैद्यकिय कर्मचाऱ्यांनी त्याची तपासणी केली आणि 1 जूनला त्याला भरती करण्यात आले. आता त्याला आयुष्यभर या समस्येला तोंड द्यावे लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले. मागील वर्षाच्या अखेरपर्यंत त्याचं वजन 177 किलो होते. टॅग्स :जरा हटकेकोरोना वायरस बातम्याचीनJara hatkecorona viruschina