झोंबीच्या हातांसारखे दिसणारे हे फंगस पाहुन तुमचाही उडेल थरकाप, पाहा कुठे आढळले By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 09:49 PM 2021-07-01T21:49:51+5:30 2021-07-01T22:00:50+5:30
भुतांच्या गोष्टी एकल्या तरी काहीजणांचा थरकाप उडतो. रात्री झोप लागत नाहीत. भुतांमधील झोंबीची गोष्ट तर आणखी भयानक. काहीजण तर कितीही भीती वाटो झोंबींचे सिनेमे बघतातच. आता तुम्हाला घाबरवुन टाकायला झोंबी फंगस आली आहे. आता तुम्ही म्हणाल फंगस कधी झोंबी असते का? अहो हो ना!...ऑस्ट्रेलियामध्ये तुम्हाला ही झोंबी फंगस दिसेल. तिला पाहताक्षणी तुम्ही घाबराल. ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल पार्कमध्ये एक फंगस उगवलीय जी झोंबिच्या हातासारखी दिसतेय. हे फोटो सोशल मिडियावर जोरात व्हायरल होत आहेत.
असं म्हणतात की ही फंगस पुर्वी होती पण नष्ट झालेली. आता ही फंगस पुन्हा एकदा दिसू लागली आहे.
याचा शोध लावणाऱ्यांनी म्हटलंय की ही फंगस अत्यंत दुर्मिळ असून हातांच्या बोटासारखी दिसते.
याचा शोध व्हिक्टोरियाच्या फ्रान्सिस द्वीप येथे १६ पर्यावरणकर्त्यांनी लावला होता.
हाइपोक्रोप्सिस अॅम्प्लेक्टेंस फंगस ज्यांना टी ट्री फिंगर्स किंवा झोंबी फिंगर्स या नावांनाही ओळखले जाते.
हे फंगस ऑस्ट्रेलियाच्या कमी दाट जंगलांमध्ये पाहायला मिळते. येथील वनस्पती आग आणि मानवी अतिक्रमणाने नष्ट झाल्या आहेत.
संशोधनानुसार हे फंगस फ्रान्सिस द्वीपवर शोध लागण्याआधी वेस्टर्न पोर्ट बे च्या तटावर आणि लॉंचिंग स्पेसवर आढळण्यात आले होते.
डॉ. माईकल अमोरा यांच्या मते हे फंगस केवळ संरक्षित राष्ट्रीय उद्यान, रॉल बॉटेनिकल गार्डन व्हिक्टोरिया येथे सुरक्षित आहेत.
डॉ. अमोरा यांच्या मते हे फंगस ज्या चार ठिकाणी उपलब्ध आहेत त्यापैकी तीन ठिकाणांवरील त्याचे अस्तित्व धोक्यात आहे. कारण, या जागा आता रेतीच्या खाणींनी भरलेल्या आहेत.
आययुसीएन यांनी बनवलेल्या फंगसच्या यादीनुसार या फंगसची संख्या जगभरात फक्त ५० ते ४०० इतकी आहे. ती जास्तीत जास्त २०० ने अधिक असेल. त्यांनी असंही म्हटलंय या फंगसचे अस्तित्व जगात ७ ठिकाणी होते. ज्यापैकी अनेक ठिकाणी ते नष्ट झाले आहे.